...

18 views

डोंबर्याची पोर
( अमोल थिटे यांच्या लेखनीतुन )

ती डोंबऱ्याची पोर..

रस्त्यात त्या दिवशी.. ढोलकीचा आवाज आला..
तुरळक होती गर्दी.. मुद्दामून कानाडोळा केला..
कामावरून सुटलेलो आधीच.. घरी जायची घाई..
वाट पाहत होती माझी.. लेकर बायको आई..
लांबून पाहिलं नाचत होती..जसा पावसात मोर..
मळके कपडे घालून.. ती डोंबऱ्याची पोर..||

पाऊल वळाली त्यादिशेने.. चला पाहू म्हणालो..
हळूहळू चालत मी.. त्या गर्दीकडं गेलो..
विस्कटलेले केसं तिचे ते.. नव्हतं लावल तेल..
उपाशीपोटी कसरत तीची.. पोटापाण्याचा मेळ..
उठून दिसत होती बर का.. तीच्या कपाळी चंद्रकोर..
पारुषीच पण गोड बाहुली.. ती डोंबऱ्याची पोर..||

आई वाजवत होती तीची.. बाप गाणी म्हणतं होता..
बघा पोरगी किती चपळ.. लोकांना सांगत होता..
बाटलीवर उभा राहिली.. नन्तर चालली दोरीवरून..
कोण किती पैसे देतय.. बघायची चोरून चोरून..
आईबापाच प्रोत्साहन तिला.. यायचा भलताच जोर..
हिरव्या बांगड्या हातात अशी.. ती डोंबऱ्याची पोर..||

तीच ते स्मितहास्य पाहून.. मन खुश झाल होत..
पैसे जमा झाले झोळीत..त्यादिवशीच भागलं होत..
खेळ संपला त्यांचा.. तस त्यांनी त्यांचं आवरलं..
दमलेली ती पोरगी..कसबस स्वतःला तिने सावरलं..
इजा ना व्हावी, ना जखम.. माझ्या जीवाला या घोर..
परत मला दिसली नाही.. ती डोंबऱ्याची पोर..
( copyright )