...

4 views

भारतीय पत्रकारीतेतला अश्वासक चेहरा रविश कुमार सर
रविश सर आपण एनडीटीव्ही सोडलीत हे ऐकून आश्चर्य वाटल नाही ऊलट समाधान वाटल.

आपण विकले गेला नाहीत तर विकले गेलेल्यांना स्वाभीमानाचा धडा देऊन आलात यातच सगळ आलं.

आम्ही स्वता: ला लेखक कवि म्हणुन घेणारे आपली भुमीका,विचार मांडत नाहीत किंबहुना आम्ही त्या कर्तव्यालाच मुठमाती दीलीय याची खंत आहे.

आपन जनसामान्यांचा आवाज आहात.
आपण पत्रकार आहात त्यापेक्षा आपण जबाबदार नागरीक आहात हीच खरी आपल्या स्वभावाची खासीयत आहे.

आपण कोणाच्या विरोधात नाहीत पण आपण सामान्य जनतेचे प्रश्न मांडतात म्हणुन आपण कोणाच्या तरी विरोधात आहात असा गैरसमज काही लोकांमध्ये आहे.

माझ्यासारख्या असंख्य लेखकांचे आदर्श आहात हे अभिमानाने मांडावस वाटत.

आम्ही भीतीपोटी लीहीत नाहीत,बोलत नाहीत म्हणुन आम्ही आपले मुलभुत अधिकारच विसरुन बसलोय याची कुठेतरी खंत वाटते.

आपला प्राइम टाईम शो बघत आसताना आपलं म्हणन कोणतरी मांडतय याच समाधान वाटायच.

आता ते प्रश्न कोण मांडणार याचाही प्रश्न पडतोच.

हे दीवसही सरतील पुन्हा आपण आमच्यासाठी टीव्हीच्या पडद्यावर आमची बाजु मांडायला दीसनार आहात याची पूर्ण खात्री आहे.

आपण आयुष्यात कधी तरी भेटाल आपल्या सोबत विचारांची देवान घेवान होईल अशी आशा आहे.

आपल्याला जागतीक स्तरावरचा रँमन मँगसेस मानाचा पुतस्कार भेटला तेव्हा खुप आनंद वाटला होता.

माझ्या देशातील पत्रकाराचा सन्मान झालेला पाहुन खुप अभिमानाने छाती भरुन आली होती.

असो खुप लीहाचय बोलाचय पण तूर्तास थांबतो पण आपल्या सोबत माझ्यासारखे करोडो तरुन आहेत याची ग्वाही देतो.

आपण न घाबरता कुटुंबाची पर्वा न करता देशासाठी दीलेल योगदान कोणीच नाकारु शकत नाही आणि विसरुसुध्दा शकत नाही हे सत्य आहे.

आपण पुन्हा ऊभारी घ्याल अशी पूर्णपणे खात्री आहे.

आपणास ऊत्तम आरोग्य आणी दिर्गायुष लाभो हीच प्रार्थना.

आपण लीहीलेल्या पुस्तकात म्हणजेच "Ravish kumar the Free voice-on democracy,culture and the nation"
शेवटच्या पानावर लीहीलय
"चला स्वतंत्र दीनानिमित्त आइस्क्रीम खाऊयात"
त्याप्रमाणेच हे आइस्क्रीम खाऊन पुन्हा कामाला लागुयात.

-संदीप जाधव पाटील
© आठवनीचा कोंडमारा