...

6 views

दुरावा... कारण फक्त एक "गैरसमज"
दुरावा... कारण फक्त एक "गैरसमज"

दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात असताना त्या दोघांसाठी त्यांच्या प्रेमाबाहेरच जग म्हणजे निव्वळ प्रतीकात्मकच जग असत.
त्यांच्यासाठी त्यांचं एकमेकांबरोबर असणं,बोलणं,आपापसात भेटणं,एकमेकांत रमुन जाणं... थोडक्यात सांगायचं झाल तर 'तो' तिचं आणि 'ती' त्याचं जग अस म्हणायला हरकत नाही...
दोन प्रेमी सहज एकमेकांना आपल्या आयुष्यात एकत्र आणण्याचे स्वप्न पाहतात आणि एकमेकांशी ऋणानुबंधहि जुळवून आणतात.
न पाहिलेल्या उद्याचा संसार थाटात सजवतात बिचारी... अगदी सहज रित्या हे एकमेकांत गुंतून गेले जातात.दोघांच्याही भावना एकमेकांसाठी इतक्या प्रेमळ असता कि 'तु' आणि 'मी' एवढीच भूमिका बजावत ते आपले आयुष्य जगायला लागतात.त्यांच्या प्रेमाचे चर्चे सगळ्या गावात असताना सुद्धा दोघे मात्र प्रेमाच्या समुद्रात तल्लीनच... प्रत्येक व्यक्ती जो त्यांच्या प्रेम विरोधात असतो त्या सगळ्या महाशयांना या दोघांनी आपले वैरी ठरवण्यात मागे पुढे पहिले नाही,त्यात एकमेकांच्या घरच्या मंडळींचा सुद्धा समावेश आलाच की...
प्रेमातले नऊ वर्षे उलटून गेली कशी गेली नक्कीच उमजले नाही,दिवसेंदिवस प्रेम घट्ट होत गेलं,पण... कोणाचं "प्रेम" लोकांच्या जळ्क्या नजरेनजरेपासून कधी वाचलंय..? अर्थात नाहीच...
असो,आता कालांतराने हळु हळु दोघेही एकमेकांबाबत "गैरसमज" बाळगायला सुरुवात करतात,दुर्दैव त्यांच...
आप्तजन लोक चांगली नव्हती न,एकाचे तीन आणि चाराचे पाच करून सांगणारे लोकं त्यांचा नशिबी होते.
आता दुराव्याची झडप दोघांवर पडलीय,ह्या दोघांनी एकमतानं एकमेकांच्या आयुष्यात येण्याच ठरवलं पण आता त्यांना सूडबुद्धीने एकमेकांपासून दुर विरह करण्याचं हे बाकीचे भडवे लोक ठरवतील ज्यांना हे प्रेम कधी मान्यच नव्हतं...
निरागस प्रेम टिकतं का हो ह्या जगात..? माझ्यामते तर नाहीच...
किती गल्लत झाली न ह्या दोघांची,आता ते वेगवेगळे आहेत,तीचं लग्ग झालं आणि हा तिच्या विरहाच्या दुःखात... तीही त्याच्या विरहाच्या सदम्यात असेल कदाचित पण नवऱ्यासमोर कशी दाखवेल..? हा रडून रडून त्याच मन मोकळं करतो पण ती त्याला आठवून तीच मन जाळते... ती रडणार तरी कशी..? तिच्या समोर तिच्या मना विरोधातला संसार आहे न. ती नको असलेलं आयुष्य काळजावर दगड ठेवून जगतेय,त्याला मात्र तिच्यापासून वेगळं झाल्यामुळे स्वतःच आयुष्य फक्त शुन्य वाटायला लागतय.

दोघे प्रेमात असताना किती बिनधास्त होते न... एकमेकांच्या सवयीत गुरफटलेले,एकमेकांच बोलणं,एकमेकांचं हसणं,त्यांचं हक्कानं एकमेकांवर रुसणं, एकमेकांसोबत घालवलेल्या वेळेच्या त्या आठवणी,ती कॉलेजहून येईल म्हणून पुलावर बसून तिची आतुरतेनं वाट पाहणं,मेसेज वर बोलता बोलता सकाळ झाली या गोष्टीच भान नसणं,काळजी पोटी एक मेकांना जेवण झालं का हा अनिवार्य प्रश्न तर रोजचाच,दोघांतून आजारी असल्यास एकमेकांच्या काळजीत लहान लेकरा सारखं ढसा ढसा रडणं,एकमेकांबाबतीत वाटणारी काळजी अशा प्रत्येक गोड,प्रेमळ आठवणी आता वेळेच्या कुशीत थांबलेल्या आहेत...

आता दोघांमध्ये प्रेम फक्त आठवण म्हणून आहे, शास्वत पाहायला गेलं तर दोघांमध्ये फक्त "दुरावा" आहे,कारण फक्त एक "गैरसमज"...





© राहुल अनिल कांडे_सहवास आठवणींचा | 197rd...