...

2 views

एक नातं माय लेकीचं...
जेव्हा मी मामाच्या घरी पोहोचले तेथे मी त्या माय लेकींना व‌ त्या मुलीच्या भावाला सोबत पाहिलं. ते तिघे मोकळ्या असलेल्या दिवाण वर बसले होते.मला त्यांना पाहून फार अचरज वाटले. मी मामांना विचारलं ''मामा ओळखता का तुम्ही यांना?"हे ऐकून मामा तर फारंच गोंधळले.. त्यांनी विचारले ''कोण गं?''
मी त्या तिघांकडे बोट दाखविले. मामांनी दिवाण‌ कडे नजर फिरवली व‌ म्हणाले, ''अरे बेटा तिकडे तर कोणीच नाही, असं‌ काय करतेस." मी थोडी घाबरले पण त्यांना परत विचारलं‌ 'नक्की तुम्हाला कोणीच दिसत नाहीये?खरं खरं सांगा माझी थट्टा करु नका!' मी उद्गारले. मामा म्हणाले, "अगं खरंच कोणीच नाही तिथे, तुझा भ्रम आहे तो...."...