...

3 views

❣️सखी ❣️👩‍🦰
*सखी*

सखी..... कोण सखी?
जिची साथ सुखावते.....ती सखी?
आनंद साजरा करण्यासाठी पहिली हाक जिला जाते.....ती सखी?
की दुखावलेल्या शांत मनासाठी जी शीतल श्रावण धारा होते......ती सखी?
रोज नियमाने GM-GN चे मेसेज किंवा डझनावारी emoji चा रतीब न घालताही, जी आपल्यासाठी सतत connected mode मध्ये असते.....ती सखी?
जिच्याशी बोलताना किती सांगू नि किती नको असं होतं.....ती सखी?
की जीला मौनाची भाषा अवगत आहे, अवाक्षरही न बोलता-जसा की शब्दाविणा संवादु-आपलं मन जी सहज वाचू शकते.....ती सखी?
प्रवासात असताना मधल्या स्टेशनवर चहा-नाश्ता (चहात आलं घालायला विसरु नकोस ग!...) घेऊन येण्यासाठी जीला हक्काने सांगता येतं, प्रत्येक वेळी
Please- Thank you म्हणण्याची कसरत न करतात....ती सखी?
जिच्या सहवासात असतांना आपल्याला...