लॉटरी
दिवसभर नोकरीच्या शोधात फिरून फिरून शेवटी संध्याकाळी घरी परतलो. खुर्चीत शांत बसून विचार करत होतो गेले 2 महिने नोकरी शोधतोय पण कुठेच काही होत नाही. तेव्हड्यात आईने पाणी आणून दिले. माझा पडलेला चेहेरा पाहून ती पण समजून गेली व काही न विचारता आत निघून गेली. बाबा रिटायर झाले आणि घराची जबाबदारी माझ्यावर पडली . पण चांगली नोकरी मिळतच नव्हती, घरातली आजारपण माझा संसार, ताईच लग्न सगळी तारेवरची कसरत होती. निमा माझी बायको बाळंत पणा साठी माहेरी गेलेली लग्न झाल्या पासून मी तिची कोणतीच हौस मौज केली नाही कि तिचे कोणतेच डोहाळे पुरवू शकलो नव्हतो. तशी ती खूप समजूतदार आहे पण तरीही तिला ही माझ्या कडून काही अपेक्षा असतीलच . मनात असंख्या प्रश्न येत होते.
तेव्हड्यात आई ने हाक मारली निलेश हातपाय धुवून घे. तसा उठलो आणि हात पाय धुवून पुन्हा खुर्चीत येऊन बसलो आई ने चहा नाश्ता...