...

3 views

शिवविचार प्रतिष्ठान
🚩 *शिवविचार प्रतिष्ठान*🚩
*१ फेब्रुवारी इ.स.१६८९*
#माँसाहेबांचा_शंभू_बाळ, #सह्याद्रिचा_छावा_कैद_झाला...
मराठ्यांच्या इतिहासातील एक सर्वात काळा दिवस. १ फेब्रुवारी...१६८९ साली आजच्याच दिवशी वाडा संगमेश्वर येथे मोगली लांडग्यांनी (मुकाबर खान आणि इखलाख खान) छत्रपती संभाजीराजांना अटक केली. आणि इथूनच सुरू झाला , काळादेखील भयचकित करणारा ४० दिवसांचा तो रक्तरंजीत प्रवास .


*१ फेब्रुवारी इ.स.१६८९*
#सरनौबत_म्हालोजी_घोरपडेंचे_बलिदान
मराठा सरनौबत म्हालोजी घोरपडे यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सुद्धा 'छत्रपति संभाजी महाराज' संगमेश्वर येथे असताना मुघल सरदार शेखनजीब खानाच्या तावडीत सापडले. या लढाईमध्ये म्हालोजी घोरपडे धारातीर्थी पडले. ९ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर शंभूराजे मुघलांच्या तावडीत सापडले होते. मराठ्यांच्या छत्रपतिला कैद करून आणले म्हणुन औरंगजेबाने शेखनजीब खानाला 'मुकर्रबखान' हा किताब दिला.
*१ फेब्रुवारी इ.स.१६८९*
छत्रपती शंभूराजांना मुघलांनी कैद केले होते आणि स्वराज्याचा राज्यकारभार पुढे चालवण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांची निवड केली.