...

4 views

लग्न, प्रेम, समाज
लग्न हि एक अशी गोष्ट आहे, जी दोन लोकांना जीवनभर सोबतीने टिकावी लागते, प्रेमाने, मायेने, चिंतेने, चिंतनाने, नवीन योग्य विचाराने हि गोष्ट सांभाळावी लागते... या गोष्टीला अर्थपूर्णतेचा विचार दिला जातो, आणि तोच विचार आयुष्यभर सोबतीने पाळला जातो, निभावला जातो...

लग्न हि काय जबाबदारी नाही... हे तर पवित्र बंधन आहे, जे सात जन्मांच मानलं जात... ते सात जन्मापर्यंत निभावलं जातं...

मग तुम्हीच विचार करा, सात जन्माचं नातं, काय एका दिवसात एकमेकांना पाहून ठरवल जात असतं काय?? फक्त दिसण्यावरून होत असतं काय??

मला आजही हि प्रथा आवडत नाही, भले हि तुम्ही कोणत्या हि प्रकारे लग्न करा(arrange marriage or love marriage) पण ज्या दोघांना जन्मो-जन्मी राहायचं, त्यांना तर एकमेकांसाठी, एकमेकांचे विचार जाणून घेण्यासाठी वेळ द्या... का सगळं मोठी माणसे, घरचीच लोकं ठरवतील काय???

त्या भेटीसाठी कदाचित तो मुलगा, व ती मुलगी चांगली वागवणूक वर्तवते, पण पुढे अशीच वागवणूक, तो वा ती ठेवेल काय याची काय गा.... ?? जोपर्यंत, मुलाला आणि मुलीला...