...

9 views

चाळीस मिनिट
फोन वाजला
एकदा ,दोनदा ,तीनदा.......
मी  पाहिलं आणि इग्नोर  केलं,
पुन्हा एकदा फोन वाजला,मी काचेतून समोर पाहिलं तोच  होता,हातवारे करत विचारात होता फोन का उचलत नाहीस?
मी समोरून फोन केला.
"Hmmmm! बोल काय बोलतोस?
" काय बधीर आहेस  का ? कधी पासून कॉल करतोय?
चल निघू या! "
" नाही ,मला थोड काम आहे,तू हो पुढे"
" किती वेळ लागेल?"
"एक तास"
"ठीक आहे . मी वेट करतो"
"नको,निघ ना तू"
"मी वेट करतोय! And that is final ,you complete your work then we'll move,Ok."
"Hmmmm"
मी फोन ठेवला,
हा असाच आहे .
घना ,नावाप्रमाणे सावळा आणि गोड. घनदाट काळे केस, तरतरीत चेहरा आणि कोणाचाही पत्ता कट करेल अशी कातील smile.
" झालं का?"
मी एकदम भानावर आले
"हो"
" मग निघू या"
" Hmmm"
जरा आरशात पाहिलं,थोडा चेहरा ठीक ठाक केला .
"चल लवकर दहा वीस पकडायची आहे"


हा असा का वागतो.त्या दिवशीच त्यानं संपवलं सगळ.तरीही त्याला माझ्याशी बोलायचं आहे.सरळ म्हणाला तू लहान आहेस .


मला ऑफिस जॉईन करून दोनच महिने झाले होते.तशी मी भिडस्त,खूप कमी बोलणारी.हा दिसायचा समोर बराच...