...

41 views

मला जर इच्छाप्राप्तीचं वरदान मिळालं तर...
इच्छा प्राप्ती म्हणजे एक "अकल्पित गोष्ट" ज्याची कल्पना ही माणसाने मनात केली नसेल... अशी शक्ती, अशी तेजता, अशी वेळ, अशी अनमोल संधी, अशी क्रिया, अशी घटना... किंवा असा आशिर्वाद...

मला नाही बरं का मिळाले असे वरदान इच्छा प्राप्तीचे... पण जर मला असं अनोखं वरदान खरचं मिळालं तर...! आज मी माझ्या मनातील विचार माझ्या लेखातून मांडत आहे. खरचं जर मला असे अकल्पित, अनोखे वरदान मिळाले तर, मी आधी अन्याय या शब्दाचा म्हणजेच कृतीचा समूळ नाश करील... कारण या अन्याय नावाच्या प्रकाराने माणसं एकमेकांवर जबरदस्तीने स्वतःच्या इच्छा लादत आहेत...

अन्याय म्हणजे न्याय नसणे...
अन्याय म्हणजे इच्छा किंवा चूक नसताना निरपराध माणसांच्या मनाचा जिवंतपणी एखाद्याने स्वार्थासाठी दोष नसणाऱ्या माणसाच्या मनाविरुद्ध त्याच्याच शरीराचा पर्यायाने मनाचा, भावनांचा, विचारांचा, स्वप्नांचा केलेला खून...

खून हा दरवेळी फक्त शरीराचाच होतो असे अजिबात नाही. अन्याय होण्यासाठी खरी झुंज तर मना बरोबरच सुरू होते, कारण मन अपराध करायला तयार नसते. मग मनावरून बारी शरीरावर येते. आणि मग अन्यायाची मालिका सुरू होते... एखाद्या चुकीच्या व्यक्तीने निरपराध असणाऱ्या माणसाला जाणूनबुजून संकटात किंवा गुन्ह्यात सहभागी करण्यासाठी बळजबरीने पापाला किंवा कृतीला भाग पाडणे. आणि त्या गोष्टी च्या विरोधात जर प्रतिकार केला तर त्या निरपराध माणसाला वर विनाकारण लादलेला प्रसंग म्हणजे सत्याचा खून करणे...
आणि जो अन्याय करतो तो जितका गुन्हेगार असतो. त्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक गुन्हेगार असतो. म्हणजेच अन्यायाला support करणारा ही जास्तच गुन्हेगार असतो...

न्याय म्हणजे खऱ्याचा सत्याचा आणि प्रामाणिकपणाचा विजय... तो जेव्हा निश्चित होतो, ठरतो, मिळतो, तेव्हाच माणूस नावाचा जीव या जगात मोकळा श्वास घेईल...
अन्याय म्हणजे डोळ्या देखत चाललेल्या चुकीच्या गोष्टीला साथ देणे...
अन्याय म्हणजे अत्याचार...
अन्याय म्हणजे खोटेपणा, चूक, पाप, भित्रटपणा...

हो मी खरचं ही एकच गोष्टी मागितली असती... "जर मला इच्छा प्राप्तीचं वरदान मिळालं असतं तर..."
या लबाड गोष्टी मी संपवल्या असत्या आणि जर या गोष्टी मुळातून कायमच्या नष्ट झाल्या असत्या. तर मग मला देवाकडे, वेळेकडे आणि निसर्गाकडे पुन्हा कोणतेच आणि कशासाठी ही वरदान मागण्याची इच्छाच उरली नसती...
कारण अन्याय नावाची सिडी एकदा नाश पावली, की मग माणूस माणसावर आपोआपच विश्वास ठेवील. सत्याने वागेल... आणि गुन्हा हा घडणारच नाही... गुन्ह्यांचा सख्खा भाऊ म्हणजेच अन्याय आणि गुन्ह्यांची सख्खी बहीण म्हणजे न्यायदेवता...
तिथे खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे होते आणि न्यायदेवता कागद बघून न्याय देते, आंधळा विश्वास ठेवते. मग शिक्षा होते निर्दोशीला...

पण का काही माहीत नाही. पण तरी ही मला असे वाटते की उशिरा का असेना पण सत्यालाच न्याय मिळत असावा किंवा मिळावा...
म्हणतात ना की, "भगवान के घर में देर हैं, लेकिन अंधेरा नहीं हैं..."

खरचं जर मला इच्छा प्राप्तीचे वरदान मिळाले तर...!!! मी अर्थातच अशीच वागेल... आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा न्याय मिळवून देईल...🙏👍

{ Poonam}🖊️