...

15 views

मोरपीसी आठवणी...!💖
मोरपीसी आठवणी....!

संध्याकाळच्या वेळी तुझी आठवण मला जरा जास्तच छळते...!
स्वस्थ बसू देतच नाही तुझ्या आठवणीने मन अस्वस्थ होते...!
रोज संध्याकाळी आपण बस स्टॉप वर भेटायचो मग आपल्या ठरलेल्या ठिकाणी बसून भरपूर मनसोक्त मनमोकळ्या गप्पा मारायच्या...!
शेजारच्या स्टाॅलवर दोघांनी मिळून एकच चहा शेअर करत घ्यायचा....मग मी माझ्या बसची वाट बघत असायची माझ्या गावच्या बसमध्ये मला बसवून माझी बस जायला निघाल्यावर मग तू तुझ्या घरी जायला निघायचास....गर्दीत मी घाबरते म्हणून मला तू कधीच एकटीला सोडून जात नसायचास...! कितीही महत्त्वाची meeting असली तुझी तरी माझ्या साठी तू postponed करायचास पण माझ्याबरोबर नेहमी रहायचास....!
खरंच किती सुंदर होते ना ते दिवस....?? परत कधी अनुभवायला मिळतील का मला...?
तुझ्या आठवणी अगदी मोरपीसा सारख्याच सुंदर कोमल , अनमोल आहेत....!
ती रम्य संध्याकाळ ,
आणि तुझ्या सोबत घालवलेले
ते सुंदर अनमोल क्षणांच्या
त्या गुलाबी आठवणी....!
अजूनही मी अगदी तशाच जपून ठेवल्या आहेत मी त्या आठवणी....!
अश्या तिन्हीसांजेच्या वेळी
फक्त आपण दोघांनीच मिळून
तासन् -तास मनसोक्त
मारलेल्या त्या गप्पा....!
तो आपल्या दोघांच्या मधल्या सुंदर संवादाच्या आणि
गप्पांच्या त्या सुंदर आठवणींनी अजून तसाच भरून प्रेमाने जपून ठेवला आहे मी
माझ्या मनाचा कप्पा....!
तु बोलायचास आणि मी फक्त तुलाच पाहत बसायचे , मला असे वाटायचे की तुझे हे बोलणे कधी संपूच नये....!
तु असाच बोलत रहावास आणि मी वेड्या सारखी तुझे बोलणे ऐकत तुझ्या कडे एकटक बघत बसावे....! तू हातवारे करून मग मला पुन्हा भानावर आणायचास....! काय गं कुठे हरवलीस....?आहेस ना...??
अशी माझी मस्करी करायचास
किती छान बोलायचास ना तू....तु माझ्या सोबत असताना मला तर वाटायचे की , हे सगळे जग इथेच थांबावे आणि फक्त आपण दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवावा.....!
तुझ्या सोबत च्या मोरपीशी आठवणी माझ्या मनावर अलवार फिरतात मनाला प्रेमाने कुरवाळत असतात...मी एकटी तुला आठवत बसते तेव्हा या मोरपीशी आठवणी मला भेटायला येतात तुझ्या आठवणीने मग माझ्या चेहर्‍यावर हलके हसु आणि डोळ्यात आपसुकच पाणी येते...कारण सोबत तुझ्या ह्या सुंदर मोरपीसी आठवणी असतात....!!
या आठवणींच्या रूपांत तु नेहमी माझ्या सोबतच असशील....माझ्या मनावर अलवार फिरणारे मोरपीस मोरपीशी आठवण बनून...!!

फक्त तुझीच जिज्ञासा...! 🙏✒️✍🏻