...

9 views

मरणार फक्त तुझ्यासाठी
यंदा कदाचित असे घडावे.....
मलाही वाटते की
प्रेमात पडावे,
कोणावर तरी निस्वार्थ
प्रेम कराव.....
आणि तिच्यासाठी मीही
किंचितसे झुरावे....
महीण्यातुन एकदा तिने
उगाच रुसावे
आणि मी मनवता मनवता
खुदकन हसाव,
रात्रभर फोनवर तिने मला सतवावे
आणि दिवसभर मी तिला
भेटीसाठी पटवावे.....
कुठे तरी एकांतात
चोरुन भेटावे
आणि जाण्यासाठी घाई
म्हणुन मी तिच्यावर रागवावे,
दोन दिवसांनी ऐकमेकांना आठवावे
मग छोटस प्रेमपत्र तिने मला पाठवाव
यंदा कदाचित असे घडाव,
मलाही वाटत की
प्रेमात पडावे.....
महेश बरोंडा