...

1 views

शिवविचार
*शिवविचार प्रतिष्ठान*
*३० जानेवारी इ.स.१६४२*
शहाजी राजे कर्नाटकास जातात
माहुलीच्या पराभवानंतर शाहजी राजे रणदुल्लाखान सोबत विजापुरास गेले. त्यांना आदिलशाहकरिता काम करायला मिळणार होते पण कडक जाचाखाली. लगेच त्यांना
रणदुल्लाखान बरोबर कर्नाटकात पाठवले गेले. शाहजी राजाच्या कर्नाटकातील कार्याची अजून
फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यांना कर्नाटकात पाठवल्यानंतरचे पहिले पत्र *३० जानेवारी १६४२* सालचे आहे व ते आदिलशाहने शाहजीराजांना लिहीले आहे.


*३० जानेवारी इ.स.१६८०*
इंग्रज सैन्याने शिवरायांपुढे शरणागती पत्करली.
*३० जानेवारी इ.स.१६८१*
छत्रपती शंभूराजांनी "बुन्हाणपूर शहराच्या तटबंदीबाहेरील बहादूरपुरा व इतर १७ पुरे अलोट संपत्ती मिळवली. यावेळी बु-हाणपूरचा सुभेदार खानजमान याने मराठ्यांना प्रतिकार न करताच बुन्हाणपूराचे दरवाजे बंद करून घेतले.