...

5 views

सर्व्हे नंबर २५ - भाग ११
सर्व्हे नंबर २५ - भाग ११



सिम्बा आणि सीमंतिनीला शोधता शोधता मी त्याच माती खोदलेल्या जागेजवळ येऊन पोहोचलो. मनामध्ये धडकी भरली होती. श्वास फुलला होता. भीतीने मनावर ताबा मिळवला आणि माझी वाणीसुद्धा बाधित झाली. आवाज फुटेनासा झाला. मनातल्या मनात देवभुबाबांचा धावा चालू केला. त्यांनी दिलेली जटा रुमालाने हाताला बांधली. काही होवो न होवो, मनाची समजूत निघाली होती. पुन्हा एकदा जोर एकवटून आवाज दिला. गार्डनमध्ये माझा आवाज घुमला आणि सीमंतिनीचाही प्रतिसाद ऐकू आला.

"सीमंतिनी ती जटा हातामध्येच ठेव, लवकर इकडे ये" मी ओरडून सांगितले. सीमंतिनी सिम्बा जवळ पोहोचली होती. आणि तिच्या समोर होती तीच लालबुंद निखाऱ्याने धुमसणारी विडी. काळोखात बाकी काहीच दिसत नव्हते. पणं इकडून तिकडे फिरणारी, अधांतरी भासणारी विडी मात्र दिसत होती. विडीकडे पाहून सीमंतिनी गोंधळली. माझ्या आवाजाकडे तीच दुर्लक्ष झालं. घाबरलेला सिम्बा तेथून पळाला. तो थेट माझ्यापर्यंत आला. मी सिम्बाला उचलून घेतले, पणं .... सीमंतिनी......

सीमंतिनीचा शोध मला अजून लागला नव्हता. सिम्बाला घेऊन आवाजाच्या दिशेने मी चालू लागलो, पण घाबरलेला सिम्बा मात्र पुढे यायला तयार नव्हता. पुन्हा एकदा शक्ती एकवटून त्याने मला झटका दिला आणि माझ्या हातातून सुटका करत घराकडे पळून गेला. सिम्बाला पकडायचं कि सीमंतिनीला शोधायचं?, कोणत्या दिशेला जायचं? या द्विधा मनस्थितीत मी अडकलो. आणि आपसूकच सीमंतिनीच्या शोधासाठी पावले वळली.

तिकडे सीमंतिनी घाबरूनच बेशुद्ध झाली होती. माझा आवाज घेण्यास आणि मला प्रतिसाद देण्यास ती असमर्थ होती. बघता बघता तो लालबुंद निखारा सीमंतिनीला खेचतच घेऊन गेला.

आवाज देत देत मी घराच्या मागच्या डाव्या बाजूला असलेल्या टाकीजवळ पोहोचलो. आणि तेवढ्यात लाईट आली. मला थोडे हायसे वाटले. उजेडात शोधणं सोपं होणार होत. कंबरेवर हात ठेवून इकडे तिकडे पाहत असतानाच मातीवर काही खेचत नेल्याच्या खुणा अस्पष्ट दिसल्या. मी घाबरलो. मनोमनी...