...

50 views

क्षणांना वेळ नाव कोणी दिले असेल...
ज्या ज्या वेळी मी फक्त एकटीच असते. त्यावेळी मी स्वतःशी बोलते संवाद करते. आणि माझ्या मनातील प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत असते. मग माझ्या मनात प्रत्येक क्षणी हा विचार येतो की, "क्षणांना वेळ नाव कोणी दिले असेल" किंवा कसे पडले असेल...

आज आपला प्रत्येक क्षण म्हणजेच वेळ ही आपल्या श्र्वासा प्रमाणे चालू आहे आणि श्वासा इतकीच महत्वाची आहे... मला खरंतर प्रत्येक नावाचचं कुतूहल वाटतं. आपण जे आयुष्य जगत आहोत माणसं, ते आपल्याला आयते म्हणजेच फुकटचे मिळालेले जीवन आहे... आपण जर विचार केला की मला जीवन ( आयुष्य ) नावाच्या खोल तळाशी किंवा सुरुवातीला जावून शोधायचे आहे की जे आयुष्य आपण जगतो आहे, त्याची सुरुवात कशी झाली. कोणी ठेवली असतील ही नावं ! देवांनी ठेवले असतील का? पण देव हे सुद्धा एक माणूसच होते. त्यांनी पूर्व पुण्याई केली, सत्मार्ग, सन्मार्ग आणि सत्कर्म केले या सत्पुरूषांनी म्हणून आपण त्यांना आज देव या नावाने पुजतो आणि निसंकोचपणे या भल्या देवरूपी माणसांवर विश्वास ठेवतो... पण तरी ही माझ्या मनातील आणि डोक्यातील प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळतच नाहीत... काय असेल या नावांमागचे गूढ किंवा संकेत किंवा पार्श्वभुमी...! की, गेलेल्या क्षणांना भूतकाळाचं का म्हणायचे...? चालू क्षणांना वर्तमानकाळचं का म्हणायचे...? आणि येणाऱ्या क्षणांना भविष्यकाळचं का म्हणायचे...???

आपण खात असलेल्या अन्नाला जेवणचं, पाऊसला पाऊस, मातीला माती, वासाला गंध, कपड्यांना कपडे, घराला घर आणि मोबाइलला मोबाईल, माणसाला माणूस... किंवा प्रत्येक वस्तूला ज्या नावाने आपण संबोधतो, ती ओळख कोणी ठेवली असेल किंवा कोणी दिली असेल.
शरीरातील अवयवांना ही जी नावं आपण आज उच्चारतो तिचं नावं कोणी दिले असतील. म्हणजेच या पृथ्वीवरील, हवेतील, जमिनीतील, आकाशातील म्हणजेच पर्यायाने निसर्गातील अशा अगणितं असंख्य गोष्टी, वस्तू आणि प्रश्न आहेत की, ज्या आपल्या पूर्वीपासून आजच्या दैनंदिन गरजा अशा प्रत्येक गोष्टींवर आपण अवलंबून आहोत...

आणि ही ओळख आपले आयुष्य किती सोपे करत आहे. आपल्याला खोलात जायची ही गरज नाही... उलट मी तर म्हणते की आयुष्य म्हणजे एक कॉपीच आहे... आपण फक्त सत्य राहून, निस्वार्थी भावनेने आयुष्यभर आनंद देण्याचा आणि दिलेल्या आनंदातून समाधान मिळवण्याचा स्वच्छ आणि प्रामाणिक प्रयत्न करत आयुष्य जगायचे...

{POURNIMA}🖊️