...

11 views

My Life story...
घेईन उंच भरारी.....✍️
बालपणी ठरवले होते घेईन उंच भरारी,स्वप्नामध्ये एका रात्री दिसली होती परी.रास्ता होता अवगड मात्र वाट होती करारी.करायचे होते सिद्ध स्वतःला पण काही नव्हती तयारी.त्या वेळचे शोध ऐकुनी येई अंगी शहारी ,पण ध्यास मात्र होता मनी घेईन उंच भरारी....

आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यास केली मग तयारी.भीती मनात,जिद्द ध्यानात ,वाट निवडली न्यारी.लोकांच्या तोंडचे शब्द चघळून म्हटले मग एक दिवस तर मिळवीन यश आई तुझी कुमारी.चालता चालता वाटेत मग लागली होती दरी,पण ध्यास मात्र होता मनी घेईन उंच भरारी...

हसत खेळत मॅट्रिक केली घ्यासानुसार यशप्राप्तीही केली उभे आयुष्यही वाटू लागली क्षम्य,मिळाली दिशा मग एका समुद्र किनारी.उंचच उंच आभाळही दिसू लागले रुपेरी.चंद्र तारे तर नृत्य करी शालू वरती चंदेरी.मात्र शिखर पार करायला अजून बाकी होता अवधी.वेळही होता, कलाही होती ,पण देऊ कशाला संधी.पण ध्यास मात्र होता मनी घेईन उंच भरारी....

एके दिवशी प्रश्न पडला कि लुकलुकत्या ताऱ्यालाही कधी करावी लागते का स्वप्नपूर्तीची तयारी.खडतर होती वाट पण साथ होती मला मैत्रिणीची मज पावलो पावली .दोघीनींही मग मार्ग निवडला अभियांत्रिकीचा भारी.आयुष्याला मिळणार होते नवे वळण हीच परीक्षा होती खरी.छोटेसे ते गाव माझे वाटू लागले मज एक भव्य नागरी.पण ध्यास मात्र होता मनी घेईन उंच भरारी.....

काट्याचा तो मार्ग निवडला पण भीतीही होती मनी.सार्थकी लावायचा होता जन्म मग काट्याची ती बागही दिसू लागली फुलेरी ,चिखलात जसे रूपवान कमळ तसेच स्वप्नामधली परी.पण ध्यास मात्र होता मनी घेईन उंच भरारी.....

दिवस तर जसे पळू लागले जसे कोसळणाऱ्या पावसाच्या सरी ,पण मार्ग निवडल्यावर उभा होता तो पाठीशी भगवंत श्री हरी,समाजाच्या नजरेत तर जन्माला आले रूपाने नारी.पण ध्यास मात्र होता मनी घेईन उंच भरारी..... 💞
#marathikavita
#life #story #Reality #marathistatus #writersofinstagram #storytelling #storywriting
© M@ñsî