...

21 views

कविता...
वाटतं कधीतरी स्वतःला
​न्याय देऊन पाहावं
​जमलंच तर स्वतःची
​दिशाभूल ही करून पाहावं...
​स्वतःशी एकांतात
​गप्पा माराव्यात...
​आणि...
​समोर जे काही येईल
​समस्या किंवा अडचणी
​ती एक नवीन संधी समजून
​आयुष्याला कलाटणी देत
​माणसानं भरभरून जगावं
​कारण..
​हा जन्म पुन्हा येणे नाही ...
​ शोभा मानवटकर...
© All Rights Reserved