...

3 views

तोबरा
तोबरा

(अलक )


           "क्या इरफानभाई आज घरकू जाना है कि नहीं ? साला और कितना कमायेगा ? " सलूनमध्ये आल्या आल्या आरशात बघत मंग्याने फिरकी घेतली ...
      
    "ओ क्या है तूम्हारे जैसे दोस्त रातके बारा बजेही आते हे फोकटमे हजामत करवाने के लिये " तोंडातला मावा सांभाळत, कस्टमरचा हेडमसाज करत इरफान हसत म्हणाला .
      

   " साले में नंही तू इधर आया ...राजधानीसे..... और ये मावा खाना छोड दे , वरना बाल नहीं कैंसर से तूम्हारा गाल कटेंगा " मंग्या मिश्कीलपणे म्हणाला खरा ,पण इरफानचा चेहरा उतरला .... त्याला बेगम शन्नो दोन महिन्यांची छोटी परी आठवली .... त्याने बाहेर येवून मावा थुंकला.... मनाची चलबीचल सुरुच होती.... भीतीने त्याने खिशातून गुटखा काढला ... आणि पुन्हा तोबरा भरला .........


(आज जागतिक तंबाखू विरोधी दिना निमित्त अलक म्हणजे अति लघू कथा लिहीण्याचा प्रयत्न केला आहे . एकदा माणसाला व्यसन लागले की ते सुटत नाही . कळतं पण वळत नाही अशी अवस्था होते , अनेक तरुण व्यसनाच्या विळख्यात अडकत चाललेत ...म्हणूनच आज तंबाखू विरोधी जनजागृती होणे काळाची गरज आहे . )


© शिव पंडित
#saynototobacco