...

2 views

हळवं नात
तिच जीवन कधीच तिच्या नियंत्रणात नव्हतं. प्रत्येकजण तिच्यावर आपली मर्जी थोपवायचे आणि तिला प्रत्येकाचं ऐकावं लागायचं 'रेश्मा' ही कथा आहे रेश्माची. रेश्मा एक अशी मुलगी होती जिच्यावर संपुर्ण घराची जबाबदारी होती. कारण तिच्या घरात ति एकटीच कमवती होती. सकाळ होत नाही की, रेश्माची लगबग सुरू व्हायची. घरातली आवराआवर, आई वडिलांचं बघणं, सगळ्यांचा नाश्ता, भावंडांची आवराआवर त्यांना शाळेत सोडणं, आणि ऑफिसला पळणं घरी आल्यावर परत घरातली काम कुणाला काय हवं काय नको यातच तिचा संपुर्ण दिवस निघुन जायचा जणु काही तिने आपलं अस्तित्वच हरवलेलं होत. सगळ्यांच बघण्यात ती स्वतःलाच हरवुन बसली होती. अस नव्हतं कि, तिची काही स्वप्न नव्हती पण घरातल्या जबाबदाऱ्याच इतक्या होत्या कि, तिला कधी स्वतःचा विचार करायला वेळच मिळाला नाही आणि याची कधी जाणीव देखील झाली नाही. तिचा स्वभाव एकदम साधा सरळ होता. कुणीही तिला एखादी गोष्ट करायला सांगितली कि ती नाही म्हणत नसे त्यामुळे तिला सगळे गृहीत धरायचे. त्यातुन परत तिचे असे फारसे मित्र मैत्रिणी ही न्हवत्या ज्या तिला समजुन...