...

5 views

संघर्ष : सकारात्मक बाजू


" युद्ध नको मज बुद्ध हवा "

संघर्ष म्हणजे दुःख, क्लेश ,इजा हे समीकरण तर आहेच , पण एक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी संघर्ष आवश्यकही असतो . तो कौशल्यपूर्ण रितीने हाताळणे आणि त्याची योग्य पद्धतीने वासलात लावणे, ही एक कला आहे. व्यक्तीशः मी संघर्ष ,वाद , कलह यांचे कोणत्याही प्रकारे समर्थन करू इच्छित नाही . कारण ते निःसंशय क्लेश आणि निंदेस पात्र आहेत . पण संघर्षरुपी काळ्या ढगाची रुपेरी रेषा दाखवून तो सुसह्य करून , निराकरणाचे उपाय सुचवून संघर्ष शमन करण्याचा प्रयत्न करीत आहे.

संघर्ष अशा बाबी प्रकाशात आणते, ज्यांची खरोखर उकल होणे गरजेचे आहे , ज्या पीडा दायक आहेत. जेथे स्वतः ची मते आहेत , त्याबाबतचा आग्रहीपणा आहे , ऊर्जा आहे ,क्रोध अथवा स्नेह आहे , अधिकार आहे अशा ठिकाणी संघर्ष होतोच. संघर्ष हा दैनंदिन जीवनाचा , मानवी स्वभावाचा अविभाज्य भाग आहे . व्यक्ती - व्यक्ती , कुटुंब , कार्य स्थळ , जमाव , समाज , देश यांमध्ये तो उदभवणे स्वाभाविक आहे . संघर्षामधून गतिशीलता , जिवंतपणा ,ऊर्जा दिसून येतात . संघर्षापासून पलायन हा त्यावरचा उपाय नाही. संघर्षासह जीवनाचा स्वीकार करून संघर्ष टाळणे , समन्वय साधणे, सकारात्मक विधायक मार्गाकडे तो वळविणे ही कला अवगत झाल्यास जीवन सुंदर बनू शकते . संघर्षामधून नकारात्मक ऊर्जा आणि भावना यांचा निचरा होत असतो. वर्तमानातला छोटा संघर्ष भविष्यातील खूप मोठा विनाश टाळू शकतो .

एखादया निर्णयातून निर्माण झालेला संघर्ष हा त्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्यास भाग पाडतो . यातुन नवीन कल्पना ,शक्यतांचा उगम होऊ शकतो . समूहांमध्ये उद्भवलेला संघर्ष हा समूहांतर्गत निष्ठा , एकी बळावण्यास कारणीभूत ठरतो . इतर समूहांशी संघर्ष करताना गुणवत्ता ,कार्यमान (performance) वृद्धीसाठी प्रयत्न केला जातो .(म्हणजे दोन विद्यालयांत क्रीडा स्पर्धा असल्यास आपल्या शाळेला विजय मिळवून देण्यासाठी आपसातील द्वेष बाजूला ठेवून सहकार्य केले जाते. ) संघर्ष शमनासाठी...