...

11 views

LIFE
प्रिये-
मी जेव्हा मरुन जाईन तेव्हा
मला जाळु नकोस
आयुष्यभर जळत होतो
आणखी चटके देवु नको
जेव्हा माझा अंत: होईल
तेव्हा तु रडु नकोस जन्मभर
मी रडत होतो .शेवटी रडणं
एकवु नको
माझ्या देहाचे ओझे खांद्यावर
नेऊ नको
आयुष्याचे ओझे मी वाहिले आहे
उपकाराचे ओझे ठेवु नको
माझ्या निष्पाप देहावर
फुलं वाहु नको
माझ्या वेदनाचा गंध फुलांच्या
वासात दडवु नको
माझ्या देहाला मातीला
शेवटी नमस्कार करु नको
आयुष्यभर पायाखाली
तुडवलंस
आता पाया पडु नको.....
"शेवटी माझ्या नशिबात प्रेमचं नाही"
- महेश बरोंडा