...

49 views

तू माझ्या मातृत्वाला जन्म दिलास...
"!!! WISH YOU MANY MANY HAPPY RETURNS OF THE DAY DEAR MY SON ***VARADRAJ*** GOD BLESS YOU 🙏...!!!"💐🎂🎁🍫🍧🎉🎊😍🤗😘❤️

आयुष्यातील माझ्या सगळ्यात आनंदाचा तो क्षण... जेव्हा मी "आई" झाले...
शब्दातून सांगता येणार नाही...
कथेतून मांडता येणार नाही...
काव्यातून रेखाटता येणार नाही...
कल्पनेतून साकारता येणार नाही...
आणि कृतीतून आकारता येणार नाही...

फक्त आणि फक्त स्पर्शातून अनुभवता येणारं... मायेचा हात लावणारं... प्रेमाची साथ देणारं... ममतेची भूक भागवणारं... तुझं माझं आजन्माचं वात्सल्याचं, मातृत्वाचं नातं आहे...

खुप खुप खुप मोठा हो...
आयुष्यातील प्रत्येक वळणावर सुख तुझ्या सोबत असेल... संकट कधी आलेच तर खचू जाऊ नकोस...
कारण तुझ्याकडे मी दिलेली "संस्कारांची, माणुसकीची, आशीर्वादाची आणि आत्मविश्वासाची" शिदोरी असेल, ती कायम तुझं रक्षण करेल... तू फक्त सत्याच्या मार्गाने आयुष्यात पुढे जात राहा आणि यशस्वी हो...

मला प्रत्येक क्षणी विश्वास आणि खात्री आहे की तू तुझ्या आयुष्यात माणूस म्हणून नाव कमवशिल...
खुप खुप शिक आणि मनाने विशाल होऊन... आयुष्याने विपुल जग हीच मनापासून इच्छा...🤗❤️
तुला निरोगी उदंड आयुष्य लाभो हीच माझी स्वामींकडे प्रार्थना 🙏 माझ्याकडून आणि पप्पांकडून पिल्लू तुला वाढदिवसाच्या वात्सल्यपूर्वक, आशिर्वाद स्पर्शी सुखमय शुभेच्छा...💐💐💐

तुझीच प्रेमळ आई...
{Poonam}🖊️