सुखी भव : सुखाची नवीन परिभाषा
सुखाचा शोध एक वेगळ्या दशनबिंदु मधून घडविण्याचा आणि सुखाबद्दलचा बाह्य दृष्टिकोन बदलून नवमर्मदृष्टीची अनुभूती सर्वांना करून देण्याचा यत्न मी करीत आहे . तथापि वाचकांनी अन्याय, अत्याचार ,अनाचार यातही सकारात्मकता आणि सुख शोधावे , अशी माझी मुळीच ईच्छा नाही. फक्त दैनंदिन जीवनातील कुरबुरीच्या छोट्या - मोठ्या तडा , भेगा सांधण्याचा माझा हा प्रयत्न आहे . तसही सामान्य माणसाच्या जीवनाचं हे जरतारी वस्त्र विरून , शंभर दुःखांच्या धाग्यांना तडजोडीची ठिगळं ही लागलीत . मध्यम वर्गीयांच्या संसाराचा हा आंबट आवळा , नवमर्मदृष्टीच्या एकतारी पाकात मुरून मनातल्या पानाची रंगत वाढवेल यात शंका नाही.
प्राचीन काळ . तपस्वी ऋषींचा आश्रम. ब्रह्मचर्याश्रम संपवून , गृहस्थाश्रमी प्रवेश करण्यासाठी , ऋषीची आज्ञा आणि आशीर्वाद घेण्यास शिष्य आशेने उभे आहेत . मोठ्या अपेक्षेने उभ्या असणाऱ्या त्यांचा , दानी गुरूने दिलेले "सुखी भव" इतकेच आशिर्वचन ऐकून हिरमोड होतो.
काळ जातो. शिष्य संसारात रुळतात. वेगवेगळ्या कार्य क्षेत्रातले ते सहाध्यायी शिकवणुकीच्या आणि गुरू आज्ञेच्या एकाच समान धाग्याने जोडलेले आहेत . सहज भेटलेल्या त्यांच्यामध्ये एकेदिवशी गुरू भेटीची आणि आश्रमाची असीम ओढ दाटून येते . आश्रमात एकत्र जमायचे असे ठरवून, सारे पुन्हा एकाच विद्याछत्राखाली जमा होतात. प्रीती संमेलनासाठी आलेल्या , त्या विद्यार्थ्यांची ऋषी , राजाला सांगून मखमली आसने वगैरेंची उत्तम सुखसोय करून देतो .सर्वांनी वंदन केल्यावर आशीर्वादासाठी मुनी हात उंचावणार , तोच एक शिष्य नम्र होऊन वदतो , हे मुने आपण दुसरा कोणताही आशीर्वाद...