...

2 views

चोंभळ...
माझ नाव दीक्षा मी आज एक प्रसंग आपल्या सोबत शेयर करणार आहे. मी एका छोटयशा गावात राहते तिथे पाण्याचा फार दुष्काळ आहे. त्या दिवशी माझ्या घरी पाहुने येणार होती म्हणुन मी सकाळी लवकर उठून आई ला कामासाठी मदत करत होते मी पटकन माझे काम आटोपुन मग आराम करुन बसले होते. घरात आई ने लगेच दूसरे काम सांगितले , बसली काय इथे घरात पाहुने येणार आहेत अन आता पाणी पन संपले घरातील जा तलावा तुन पानी घेऊन ये , हें एकल्या वर माला खुप राग आला, तसेच मी रागात उठत एकदम 3 हांडी आणि एक चोंभळ (एक कापड़ी गोल आकराची वस्तु जी हांडी खाली बैलेंस साठि ठेवतात) सोबत घेतली.
आमच्या गावापसुन थोड्या लांब अंतरावर एक तलाव होता, तिथे एक वहत्या पाण्याचा झरा आहे तिथे आल्यावर तिन्ही हांडी पटकन भरून घेतली परंतू खरा प्रसंग तर आता ओढावनार होता. सुर्य मथ्यावार आला होता साधारण दुपारचे 12 वाजले होते पण आता माझेच 12 वाजले होते, तिथे अजुबाजूला कोणीच नव्हते जशी चोंभळ डोक्यावर ठेवली की हांडी उचलनया साठी खाली वाकनार की चोंभळ डोक्यावरून खाली पडून जात असे खुप प्रयत्न करूनही तसेच घडत होते. मी कुणाच्याही मदती शिवाय हांडी डोक्यावर ठेऊ शकत नव्हते. शेवटी मी वैतागुन बाजूला बसून घेतले, तिकडे घरी आई वाट बगत होती ती एक वेगळीच चिन्ता लागली होती, तेवढ्यात समोर आई हम्बरडा फोडित तलाव जवळ आली अन मी बसून आहे हे बगुन आईचा पारा जास्तच वर चड़ला आणि तिने माझ्या थोबाडित 2 - 3 जोरात लावल्या. अन मी रडतच डोक्यावर हांडी ठेवत आई सोबत घराकडे निघाले.
© All Rights Reserved