...

6 views

सोशल मिडीया साहित्य आणि लग्न ...
सोशल मिडीयावर एखाद्या साहित्यीकाच्या साहित्याचा अस्वाद घेणारे वाचक आजकाल एखादया लग्नाला आल्या सारखं वागतात नाही का , म्हणजे बघा .. लग्नात कसं आहेर दिला जातो , शुभेच्छा दिल्या जातात वधु वर देखिल हसत हसत शुभेच्छांचा स्विकार करतात . एखादया वयस्कर माणसाला अगदी वाकून नमस्कार करतात . सोबत मस्तपैकी फोटो घेतला जातो . .. हो यात अपवादही असतात काही जण येतात जेवतात आणि तोंडही न दाखवता तसेच निघून जातात शुभेच्छा देणं तर लांबच ...
बरं काही जणांच बारीक लक्ष असतं ... जेवण कसं आहे . . लग्नाचं डेकोरेशन कसं आहे कॅटरर कोणता ? , कुणी कसा पोशाख केलाय वगैरे वगैरे आणि यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्या घरच्या लग्नात अगदी जशाच्या तशा घेण्याचा प्रयत्न करतात ...
आणि हो . . ज्यांनी ज्यांनी आहेर दिला आहे ते सगळे त्यांच्या घरच्या लग्नात किती आहेर मिळतो याची उत्सुकतेने वाट पाहतात ... मानपानाबद्दल न बोललेच बरे नाही का ..
बाकी आपण सुज्ञ आहात ..
आहेर म्हणजे लाईक , शुभेच्छा म्हणजे कमेंट आणि लग्नातल्या गोष्टी जशाच्या तशा उतरणारे 'अनुकरणप्रिय ' लोक आपणांस माहितच आहेत . .
असो . . . हे लिहिण्यामागे कोणत्याही आहेराची अपेक्षा नाही बरंका...

© शिव पंडित
#socialmedialitrature
#plagiarism
#harshtruth
#humor
#metaphor
#sacrasticwriting