...

52 views

'पुरूष' एक भावना असलेला जीव...
पुरूष ( gent's ) ही एक जात आहे, माणसाची...
पण पुरूष हा शब्द जरी स्त्री जातीच्या विरुद्ध असला तरी, स्त्री आणि पुरूष हे दोन जीव एकमेकांच्या वर अवलंबून होते, आहेत आणि असणार आहेत...

जशी या निसर्गात, पृथ्वीवर किंवा जगात जीवसृष्टी निर्माण झाली, तसा हा नर मादीचा खेळ एकमेकांवर अवलंबून म्हणजे ते एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत... अगदी तसेच म्हणजे माणसांचे ही स्त्री आणि पुरूष यांचे आहे... जर नर आणि मादी एकत्र आलेच नाहीत तर ही दुनिया, ही सृष्टी कशी उत्पन्न होईल आणि कशी वाढेल...
पण आपण एका गोष्टीचा कधी बारीक विचार केला आहे का ? की पुरूष नावाचा माणूस, तो जरी कणखर असला, रांगडा असला, शूरवीर असला, निर्भिड असला, मर्द गडी असला, प्रत्येक वेळी कोणत्याही संकटांना सामोरा जाणारा धाडसी असला तरी "तो पण एक माणूस नावाचा जीव आहे पुरूष म्हणजे..."

त्यालाही मन आहे...
त्यालाही भावना आहेत...
त्यालाही सुख दुःख आहे...
त्यालाही वेदना होतात...
त्यालाही इच्छा आहेत...
त्यालाही स्पर्श आहे...
त्यालाही हसू आहे...
त्यालाही आस आहे...
त्यालाही तळमळ आहे...
त्यालाही अश्रू आहेत...
त्यालाही ढसाढसा रडावं वाटतं, त्यालाही कुठे तरी मोकळा श्वास घ्यावा वाटतो... कारण प्रत्येक वेळी, प्रत्येक पुरूष हा चुकीचाच असतो असे नसते... स्त्री नावाचा जीव रडून स्वतःच्या मनातील दुःख किंवा भावना हलक्या करतात... पण कधी कोणता पुरूष ढसाढसा रडताना पाहिला आहे का ? तो हसू शकतो मोकळा... पण तो रडू शकत नाही आणि रडून रिकामा होत नाही किंबहुना तो रडू शकत नाही किंवा त्याला रडता येत नाही... का ? खरचं का बरं तो ही रिता होत नाही... ?

हसणं खरचं फार सोपं आहे, पण रडणं खरचं तितकच महाकठीण आहे... आणि ज्या अवघड गोष्टी हाच पुरूष पुढे होऊन करतो, तोच पुरूष स्वतःचे दुःख स्वतःच गिळतो...

पुरूषांवरही अन्याय अत्याचार होतो. मी एक स्त्री असून हे लिहीत आहे. कारण हे सत्य आहे... कोण म्हणतं पुरूषांवर अन्याय होतं नाही... प्रत्येक वेळी चूक किंवा गुन्हा किंवा पाप हे पुरुषच करतो किंवा तोच जबाबदार असतो असे अजिबातच नाही...
पण आजचा कायदा स्त्रियांच्या बाजूने आणि पुरुषांच्या विरोधात आहे. म्हणून दरवेळी चूक त्याचीच असते असे कदापिही नाही... आणि ते मला मान्य ही नाही... असतील, म्हणजे आहेतच काही पुरूष गुन्हेगार... पण सगळेच पुरूष सारखे, समान आणि वाईट नाहीत...

खरचं आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जो चुकीचा असेल त्याला शिक्षा ही व्हायलाच हवी... पण इथे प्रत्येक गोष्टीत किंवा प्रकारात "गव्हा सोबत बिचाऱ्या किड्यांना ही रगडले जाते..."
( जगाला पुरूष फक्त बाहेरूनच दिसतो, आतला पुरूष कोणालाच दिसत नाही फक्त त्याच्या स्वतः शिवाय...! )

{Poonam}🖊️