क्षण सोनेरी
मुक्ता आणि विराजच लग्नानंतरच प्रेम नव्हतं. ते एकमेकांना कॉलेजच्या पहिल्या दिवसापासुन ओळखत होते. त्यांची ओळख दोघांच्या कॉमन मैत्रीणीमुळे झाली होती. दोघही एकमेकांना खुप समजुन घेत असत. कॉलेजचे सगळे मित्र-मैत्रीणी म्हणायच्या मैत्री कशी करायची ते या दोघांकडुन शिकावं. त्याच मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं होतं. मुक्ता आणि विराजची मैत्री जितकी खरी होती तितकेच दोघ प्रेमात देखील आखंड बुडाले होते. त्यांच्या या प्रेमाचा विचार करून संगतमताने दोघांच्या आई वडीलांनी त्यांचं लग्न लावुन दिल होत. विराजच मुक्तावर खुप प्रेम होतं दोघ ही एकमेकांची खुप काळजी घ्यायचे. मुक्ताचे तर विराजला दिवसातुन कमीतकमी पंधरा ते वीस तरी कॉल्स असायचेच आणि विराज तो तर मुक्ताला सरप्राईजेस देण्याचे बहानेच शोधत रहायचा. एकदा तर मुक्ताचा वाढदिवस होता लग्नानंतर चा तिचा तो पहिलाच वाढदिवस होता. पण नेमकं मुक्तालाच आपला...