...

3 views

अधुरी एक कहानी
प्रेम हे प्रियकर प्रेयसीच असो किंवा लग्नबंधनात अडकलेल्या जोडीदारांमधलं असो प्रेम हे प्रेम असत. प्रेमात व्यक्ती आपली हद्द देखील पार करतात.
अशीच कथा आहे विरेन आणि संध्याची. विरेन आणि संध्याच खूप लवकर लग्न झालं होतं. विरेन एक डॉक्टर होता तर संध्या एअरहोस्टेस होती त्यामुळे लग्नाआधी एकमेकांना समजून घ्यायला दोघांनाही म्हणावा तसा वेळ मिळाला नाही. आपल्या अपेक्षा, आवडीनिवडी जाणून घेण्या आधीच त्या दोघांचं लग्न झालं होतं. विरेन आपल्या कामात रमणारा होता तर संध्या एकदम बडबडी हसवणारी आनंदी स्वभावाची मुलगी होती. तिच्या याच स्वभावामुळे संध्या सगळ्यांना आवडत होती आणि हेच सगळ्यात मोठ कारण ही होत की, विरेनच्या घरच्यांना ही संध्या खूप आवडली होती.
सगळ्यांना असच वाटलं होतं की आपल्या घरात संध्या आली आहे त्यामुळे आता विरेनच घरात लक्ष लागेल आता विरेन आनंदी सुखी राहू लागेल दोघ आनंदी राहतील पण अस झालं नाही. संध्याच्या लग्नाबद्दल खूप वेगळ्या अपेक्षा होत्या तिची इच्छा होती आपला नवरा हा खूप आनंदी स्वभावाचा मनमोकळ्या स्वभावाचा असावा त्यानी घरासाठी देखील वेळ काढला पाहिजे.
आपलं मन जपलं पाहिजे आपल्यावर खूप प्रेम करावं नवरा बायकोच नात न समजता तेच नात निखळ मैत्रीचं समजावं या संध्याच्या अपेक्षा होत्या.
पण झालं वेगळंच विरेन स्वतःतच रमणारा मुलगा होता. त्यामुळे तो फक्त आपल्या कामाकडे आणि स्वतःकडे लक्ष द्यायचा. अस नाही की त्याला संध्या आवडत न्हवती पण शांत स्वभाव असल्याने त्याला आपल्या भावना व्यक्त करता येत नसत. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद होत असत. त्यांचे सुरुवातीचे काही महिने आनंदी गेले होते पण नंतर हळूहळू त्यांना आपलं नात नकोस वाटू लागतं आणि म्हणून दोघही आपापल्या क्षेत्रात व्यस्थ होतात. विरेन आपल्या मेडिकल लाईन मध्ये आणि संध्या एअरहोस्टेसच्या लाईन मध्ये. असेच काही दिवस जातात. आणि एक दिवस संध्याच्या आयुष्यात समीर नावाच वादळ येत. समीर एक बिझनेसमन असतो जसा संध्याचा स्वभाव असतो तसाच समीरचा ही स्वभाव असतो. दोघांची भेट एका ट्रिपमध्ये होते आणि मग दोघ भेटतच राहतात इकडे विरेनला ही एक डॉक्टर मुलगी भेटते विनया. विनयाचा स्वभाव ही विरेन सारखाच असतो विनया विरेनची बालमैत्रीण असते पण वयाच्या 12व्या वर्षीच तिची फॅमिली यूएसला शिफ्ट होते त्यानंतर दोघांची खूप वर्षांनी एका मेडिकल कॉन्फरन्समध्ये भेट होते. आणि ती दोघही एकमेकांना भेटू लागतात. विनया अगदी विरेन सारखीच असते साधी मितभाषी आणि तिला विरेनच मनही समजत असत कधीही विरेन दुःखी असला की विनया त्याला सोबत करायची त्यालाही विनया जवळ आपलं मन मोकळं करायला आवडत असे. त्यानी प्रत्येक गोष्ट विनयाला सांगितलेल्या असतात. विरेन आणि संध्या कसे भेटले एकमकांचा स्वभाव एकमेकांमधली भांडण अश्या बऱ्याच गोष्टी इकडे संध्याही आपल्या गप्पांमध्ये विरेनबद्दलच सांगायची.
संध्याला विरेनचा स्वभाव आवडायचा पण तीच मन ही गोष्ट मान्य करत नव्हतं. प्रेम दोघही एकमेकांवर करत होते पण विरुद्ध स्वभावामुळे त्यांना व्यक्त करता आलं नाही. पण जेव्हा दोघांच्या आयुष्यात समीर आणि विनया आले तेव्हा त्यांना आपल्या खऱ्या प्रेमाची जाणीव होते. आणि त्यांना आपली चूक समजते. लग्न झालेलं असतानाही अस दुसऱ्यांबरोबर फिरणं त्यांना चुकीचं वाटू लागतं. आणि ती दोघ समीर व विनयाला आपल्या मनातल सांगायचं ठरवतात.
एक दिवस संध्या समीरला डिनरला बाहेर घेऊन जाते आणि आपल्या मनातल शेअर करते ते ऐकून मनात खुश होऊन समीर एक फोन करतो.
काही वेळा नंतर त्याच हॉटेलमध्ये विनया आणि विरेन देखील येतात त्या दोघांना एकत्र येताना बघून संध्या आश्चर्यचकित होते आणि संध्या व समीरला एकत्र बघून विरेन सुद्धा सरप्राईसड होतो. पण खरी गम्मत पुढेच होते. समीर आणि विनया आपली ओळख सांगतात. "आम्ही नवरा बायको आहोत आणि तुम्हाला दोघांना एकत्र आणायचा हा आमचा प्लॅन होता." अस जेव्हा दोघ सांगतात तेव्हा तर दोघ अजूनच सरप्राईजड होतात विरेन समीरला विचारतो. "पण आमच्या भांडणाबद्दल तुम्हाला कस समजलं." समीर पुढे बोलणार तेवढ्यात मागून आवाज येतो तो आवाज असतो विरेनच्या फॅमिलीचा कारण या सगळ्या प्लॅनचे मेन सूत्रधार विरेनची फॅमिली असते. ते घडलेली सगळी कहानी विरेन आणि संध्याला सांगतात ते ऐकून दोघेही आपली चूक कबूल करतात आणि सगळ्यांसमोर आपलं प्रेमही व्यक्त करतात मग सगळे या आनंदात छान डिनर करतात.

© dhanashri