...

46 views

तू आहेस म्हणून मी आहे आज...
"जन्मोजन्मी तू जन्म घे माझ्या आधी आई आणि मला जन्माला घाल तू माझी होऊनी आई..."

अग किती मस्ती करतेस पूनम...
बास जरा, जपून... पडशील, धरपडशील... आणि पुन्हा रडशील...
पण लगेच विसरशील, आणि अजून तुझी मस्ती सुरू करशील...😍

हेच शब्द ऐकायचे आहेत प्रत्येक जन्मी मला "आई तुझ्या तोंडून"...
हाच स्पर्श हवा आहे प्रत्येक जन्मी "आई मला तुझ्या कडून"...
हीच ऊब हवी आहे प्रत्येक जन्मी "आई मला तुझ्या कुशीत"...
हीच चव हवी आहे प्रत्येक जन्मी"आई मला तुझ्या हाताची"...
हाच आशीर्वाद हवा आहे प्रत्येक जन्मी "आई मला तुझ्या ममतेचा"...
हीच काळजी हवी आहे प्रत्येक जन्मी "आई मला तुझ्या मायेची"...
हीच जागा हवी आहे प्रत्येक जन्मी "आई मला तुझ्या हृदयात"...
हेच संस्कार हवे आहेत प्रत्येक जन्मी "आई मला तुझ्या धाकात"...
माझी हट्टी मुलगी आहेस तू हाच लाड हवा आहे प्रत्येक जन्मी "आई मला तुझ्या मुखात"...
माणूस म्हणून जन्म मिळावा पुन्हा या जगात...
मुलगी म्हणून पुन्हा पुन्हा पुन्हा जन्म हवा प्रत्येक जन्मी "आई तुझ्याच ओटी पोटात"...

आई मी तुझं आणि बाबांचं लाडकं लेकरू आहे. खुप हट्ट केले आणि तुम्ही दोघांनी ते हक्काने पुरविले... पण तुमचे संस्कार वाया जातील असे आम्ही तिघे ही कधीच चुकीचे वागणार नाहीत, याची तुम्हा दोघांना खात्री आणि गर्व आहे. आणि त्याची जाणीव आम्हा भावंडाना आहे 🙏

"आई" ही व्यक्ती म्हणजे काय असते हे मी अनुभवले आहे एक आई होऊन... मी ही एक आई आहे... पण स्वतः आईची जागा घेतल्यावरच आई म्हणजे काय असते त्याची जाणीव होते...

"आई तुला निरोगी दीर्घायुष्य लाभो... दर वर्षी आणि प्रत्येक जन्मी मी देवाकडे तुलाच "माझी आई" म्हणून मागणे मागीन हीच इच्छा पूर्ण होवो..."

तुम जियो हजारो साल... साल के दिन हो सौ सौ सौ हजार...
वाढदिवसाच्या कोटी कोटी कोटी असंख्य शुभेच्छा "आई" तुला...💐💐💐🙏🙏🙏

तुझीच लाडाची लेक
{पौर्णिमा}🖊️