...

39 views

फुंकर...
फुंकर या शब्दातच गारवा आहे. किती थंड वाटते कोणी तरी आपल्याला झालेल्या जखमेवर हळुवार फुंकर घातली की..... खरतर ती फुंकर म्हणजे निम्मित असते शरीरावरील जखमेचे... पण खरी फुंकर किंवा गरज असते ती शरीराच्या निघालेल्या कातडीमुळे मनाला झालेल्या वेदनांचा विसर पडावा म्हणून ती फुंकर काम करते खरे तर मनावरच्या दुखण्यावर...

पण जर चुकून एखाद्याच्या आयुष्यात नकळत कोणत्याही कारणाने जर ( दुःख तर कोणालाच असू नये. प्रत्येक्षात तर नकोच नको, पण विचारत ही दुःख नको...) कोणाला दुःख झालेच तर, आपणही माणुसकीची फुंकर माणूस म्हणून एखाद्याच्या मनावर घालायला यायला पाहिजे...

शेवटी शरीराच्या वेदना ह्या ज्याला त्याला स्वतःलाच सहन करावयाच्या आहेत. पण आपल्या तोंडातील हवेच्या फुंकरीपेक्षा, आपल्या मनाची म्हणजेच आपल्या निस्वार्थी आणि प्रामाणिक मनातील फुंकर त्याच्या मनावर नक्कीच सुखाची खपली आणेल... जरी आपण पूर्ण जखम नाही बरी करू शकलो, तरी शब्दांची आणि भावनांची फुंकर मनाबरोबरच आपोआप तनाला ही ठीक करेल...
आपल्याला नक्कीच समाधानाची फुंकर घालता यायला हवी... का नाही येणार, इच्छा असेल तर मार्ग सापडतोच.....

{POURNIMA}🖊️