...

43 views

"एक जन्म तुझ्यासाठी"...भाग-4
हो, त्यानंतर आमची भेट पुन्हा झालीच नाही... तो पुढे कुठे गेला, काय शिकला, त्याचे आई बाबा कुठे आहेत, तो कुठे आहे हे मला समजलेच नाही.
जशी ही story अर्धी अर्धी वाटतं आहे ना... तसेच काहीसं झालं आयुष्यात...
माझं शिक्षण पूर्ण झालं आणि आई बाबांनी माझं लग्नाचं योग्य वय झाले की खूप थाटामाटात माझं लग्न केलं.
अतिशय सुरेख आणि अविस्मरणीय विवाह सोहळा संपन्न झाला, आणि माझी पाठवणी ही भरल्या ओटीने आणि भरल्या डोळ्यांनी मी माझ्या नव्या जीवनात, नव्या संसारात, माझा जोडीदार त्याच्या सोबत नवीन आयुष्याची सुरुवात केली... मला एक गोड मुलगा आहे.
मी माझ्या संसारात खूप खूप खूप सुखी आनंदी आणि समाधानी आहे...
माझे पती माझ्यावर इतके प्रेम करतात की त्यांच्या प्रेमाची तुलनाच होणार नाही... माझा सुखानी भरलेला संसार आहे...
पण मला रोज त्याचीही न चुकता आठवण येते... ( प्रेम ही भावना नैसर्गिक आहे, ना ठरवून होते, ना हिसकावून होते, ना त्याला कोण आडवू शकत, ना थांबवू शकत... ) आणि आठवणींना ही आपल्याला मनातून पुसून टाकता येत नाही...

पुढे काही वर्षांनी अचानक मी एका मासिकात असेच वाचन करताना मला तो शब्दांनी भेटला... त्याचे शब्द माझ्या ओळखीचे आहेत, विशेष म्हणजे मी लेखकाचे नाव वाचण्याआधीच त्याला ओळखले आणि नाव वाचल्यावर खात्री पटली की हा हाच आहे.. "विश्वास तर होताच" आता खात्री पण झाली...

जे त्याला सांगायचे होते तेच होते त्याच्या लेखात. मग त्याच्या मनातील भावना आणि आम्ही एक नाही होऊ शकलो हे त्याने त्याच्या प्रेमळ, निरागस आणि प्रामाणिक शब्दात लिहिले होते... जे मला वाटत होते तेच अगदी तसेच त्याने लिहिले होते...
त्याचे ही लग्न झाले आहे, त्याला दोन मुलं आहेत ( एक मुलगा, एक मुलगी )
खूप खूप खूप सुखी संसार आहे त्याचा... आई गेली त्याची, बाबा त्याच्या जवळ असतात. तो एका चांगल्या कंपनीत नोकरीला आहे...
पण का कोण जाणे.. "मला त्याच्या शब्दांवरून तो कुठेतरी दुःखी वाटला, उदास वाटला, एकटा वाटला..." मी त्याला त्या दिवसापासून नाही पाहिला आज पर्यंत नाही भेटला मला तो नजरेने, पण मनाच्या डोळ्यातून मी त्याला बघत असते...

देवा त्याने आणि मी निर्मळ, निस्वार्थी, निष्पाप प्रेम केलं... ना हाव, ना कधी वासना, ना कधी अपशब्द, ना कधी मन दुखावेल अशी भाषा, ना कधी खोटेपणा, ना कधी स्वार्थ आणि ना पाप... फक्त आणि फक्त एकमेकांचा आनंद आणि घरच्यांना ना दुखावणे हाच कायम प्रयत्न... याला म्हणायचं सच्चा प्यार...! तनाने नसेल पण मनाने मी तुझ्या सोबत असेल...
मनातील आठवणींना आणि भावनांना वाट मोकळी करून मी माझ्या मनात म्हणते देवा जर खरचं सात जन्म असतील तर सहा जन्म माझ्या पती साठी आणि "एक जन्म तुझ्यासाठी" मी मागते परमेश्वरा जवळ...
त्याच दुःख नाहीस कर, त्याला त्याच्या जीवनात सुख मिळू दे, आनंदाने भरून वाहुदे त्याचे आयुष्य... जगण्यातील प्रत्येक गोष्ट आणि आयुष्य त्याला भरभरून जगू दे... निरोगी उदंड आयुष्य लाभावे त्याला आणि सुख म्हणजे काय असतं हे त्याने अनुभवू दे... माझ्या शुभेच्छा अखंड सोबत तुझ्या आहेत...

( कथा काल्पनिक आहे. मला "एक जन्म तुझ्यासाठी" हे शीर्षक खूप आवडले म्हणून मी तिथे स्वतःला ठेवून पहिल्यांदाच love story लिहिण्याचा प्रयत्न केला आहे आणि या कथेला मी माझ्या शब्दातून हुबेहूब वास्तव स्वरूप दिले आहे आणि वाचताना असे भासत आहे की ही real story आहे... धन्यवाद 🙏)

{POURNIMA}🖊️