...

10 views

जेव्हा निसर्ग सूत्र हातात घेतो
जेव्हा निसर्ग सूत्र हातात घेतो

निसर्ग पृथ्वीला लाभलेली अनमोल देणगी आहे. सुरवातीपासूनच निसर्गाच्या सानिध्यात माणूस जगत आलेला आहे;अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा याच निसर्गामुळे पूर्ण होतात आणि ह्या गरजा पूर्ण करताना निसर्ग कुठलाच भेदभाव करत नाही मग समोरचा अमीर असो वा गरीब, पशू असो वा पक्षी अगदी सर्वांना तो देत असतो.
निसर्ग हा शब्द उच्चारला म्हणजे आपल्या डोळ्यापुढे डोंगराची रांग, निर्मल आणि झुळझुळ वाहणारे झरे, अथांग सागर,तलाव आणि सरोवरे, घनदाट जंगल, हिमालय पर्वत, तळे, वाऱ्याच्या झोक्यावर झुलणारी हिरवीगार शेते, उगवणारा सूर्य, रंग बदलणारे आकाश, चांदण्याचे न संपणारे छत अशा अनेक गोष्टी आठवतात.निसर्गाचे हे सौंदर्य शब्दात व्यक्त करण्यासारखे नसून ते अनुभवायची बाब आहे.या सर्व गोष्टींचा आस्वाद घेताना कधी कधी माणूस त्याचे माणूसपण विसरतो मग तो निसर्गाला त्रास देतो किंवा विनामूल्य मिळणाऱ्या गोष्टींचा चुकीचा वापर करतो.शेवटी माणसाला त्याची चूक लक्षात आणण्यासाठी निसर्गाला सूत्र हातात घ्यावी लागतात आणि एकदा माणसाला त्याच्या चुकीची जाणीव झाली की परत तो पूर्वरत होतो.
साधारणणे दहा ते पंधरा वर्षे मागे वळून बघता पृथ्वीच्या तेव्हाच्या आणि आताच्या स्थितीतला फरक स्पष्ट लक्षात येईल.याच दहा ते पंधरा वर्षात प्रचंड औद्योगिकरण झाले, गाड्यांची संख्या वाढली, काँक्रिटीकरनामुळे अनेक झाडे कापल्या गेली आणि मोठमोठ्या इमारती उभ्या राहल्या, शेकडो झाडे कापून वसाहती वाढल्या मग याचा परिणाम निसर्गावर झाला; परिणामी निसर्गचक्र बदलले.लहानपापासूनच आपण शिकत आलो की मुख्य तीन ऋतु असतात पण आता तर उन्हाळ्यात पाऊस आणि पावसाळ्यात रखरखते ऊन जाणवत आहे. पावसाअभावी याच निसर्गाची अनमोल देणगी असलेले झरे, तलाव, नदी पूर्णपणे आटून जातात आणि पाणीच न मिळाल्याने कित्येकांचे प्राण जातात.मग आता या सर्व चित्राला कारणीभूत कोण?... अर्थातच मानव. काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे की महाराष्ट्रमधे पाऊस नाही म्हणून कृत्रिम पावसासाठी अमेरिका येथून आत्याधूनिक विमान बोलावण्यात आले होते.आता या स्थितिवरून लक्षात येईल की पाऊस सुध्धा आता नैसर्गिकरीत्या येत नाही म्हणजे खरंच निसर्गचक्र कुठेतरी बदलले आहे.
शीर्षकाप्रमाणे 'जेव्हा निसर्ग सूत्र हातात घेतो' म्हणजे प्रत्यक्ष निसर्ग बदला घेतो असे नाही पण मानवाने जे निसर्गचक्र तोडले याचाच विपरीत परिणाम त्याला भोगावा लागत आहे.झाडे तोडली म्हणून जमिनीची धूप होत आहे.कुठे अगदी जास्त पाऊस तर कुठे कोरड आहे.मग जेथे जास्त पाऊस तेथे महापूर तर जेथे पाऊस नाही तेथे उपासमारी आहे.वृक्षसंख्या कमी झाली म्हणून पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही.
वैश्विक महामारी म्हणून घोषित झालेला कोरोनामुळे पण स्वच्छतेची सवय लागली.ओझोन ला पडलेले भगदाड पूर्णपणे भरून निघले, एकंदरीत पृथ्वीवरचे प्रदूषण कमी झाले.दुर्दैवाने या साथीने अनेकांचा मृत्यू झाला.सांगायचे तात्पर्य ऐवढेच की माणसाने जेव्हा जेव्हा निसर्गाला बदलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा निसर्गाला रौद्र रूप धारण करावे लागले. बदल हा निसर्गाचा नियमच आहे पण तो नैसर्गिकरीत्याच झाला पाहिजे त्यात जर मानवाने ढवळाढवळ केली तर मात्र गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.
अलीकडे अनेक संस्था निसर्गाला जपण्यासाठी पुढे आलेल्या आहे, निश्चितच आपण त्यांना सहकार्य केले पाहिजे.जास्तीत जास्त झाडांची लागवड करून हा निसर्ग प्रत्येकाने जपायला पाहिजे असे झाले तर माणूस आणि निसर्ग हे नाते अजून बळकट होईल आणि निसर्गाला सूत्र हातात घ्यावे लागणार नाही.