...

15 views

हरवलेली मैत्रीण💝
रस्त्यानी जातांना एक चॉकोलेट चे
बालपणीचे रुसवा फुगवीचे भांडण
आठवेन का आज तिला......
कितीही घाईत असली तरी ए चल
ना ग लवकर उशीर होतोय म्हणणारी
ती तर खूप आठवते मला ......
तिचा गृहपाठ झालेला असला तरी
मला वाचवण्यासाठी बेंचखाली बसून
लिहायची ती अति घाईत....
सायकलचे टायर पंक्चर झाले तर राग तिनी
कधी धरला नाही ......
सोबत सुट्टी मारायची मग पिन टोचून
स्वतःच्याही सायकलला.....
नसला कधी टिफिन माझा तर दोन
घास ती भरवायची ........
चालता चालता धपकन पडली मी
एकदा तर रडू लागली ती स्वतःच ......
देवबाप्पा नको न तिला त्रास होईन न
सांगायला धावत मंदिरात जायची.....
कितीही हट्टीपणा केला मी तरी मला
मनवतच राहायची .......
हरवलेली मैत्रीण ती माझी ओढ लागलीये
तिला भेटायची.....✍️
#story #marathi#maitrin#friend #bestfriend#marathikavita#care#love #storyteller #fb

© M@ñsî