...

0 views

गुंतणे...
स्वतःत गुंतणे हे त्रासदायक नसते जितका त्रास दुसर्‍यात गुंतून होतो. गुंतल्याने त्रास होत नाही तो गुंता सोडवताना होणार दुःख जास्त त्रास देते. गुंतन्या आधी का कधी कोणी विचार करत नाही की हेच पुढे जावून सांभाळणे अवघड होईल मनावरही त्याचाच जास्त त्रास होईल सुख सगळी आपोआप नाहीशी होतील इतके गुंते वाढतील की आयुष्य नकोसे वाटेल हे त्या क्षणाला कधी उमजत का नाही....म्हणून स्वतःत गुंतणे कधीही चांगले दुसर्‍यात गुंतन्यापेक्षा .
तो गुंता ज्या व्यक्तीला समंजसपणे सोडवता आला त्याच जीवन हे सर्व कठिण प्रसंग झेलून स्वतःला सावरू शकते. कधीकधी अस वाटे की आपण ह्या आयुष्यात का आहोत जर आपलं काय मह्त्व नाही तरीही आपण का जगतोय तर त्यावरही आपल्याला मनाला समजावता आल पाहिजे सकारात्मक विचार जास्त केले पाहिजेत ज्याने मन आणि बुद्धी वाईट विचारापासून दूर राहते. प्रत्येक वेळा आपण जर नकारात्मक विचार केले तर त्याचा काहीनाकाही परिणाम हा मेंदूवर होतो मग शारीरिक अडचणींना तोंड द्यावे लागते. समोर कितीही मोठा संकट येवो डगमगून जायचे नाही इतक लक्षात ठेवायचे.


All Rights Reserved