...

53 views

गुढी निर्मळ नात्यांची...🙏
गुढी आपल्या निर्मळ नात्यांची...
गुढी रक्ताच्या जुन्या आणि जोडलेल्या नवीन नात्यांची...
गुढी आपल्या कडू गोड नात्यांची...
गुढी कडूलिंब आणि साखरे सारख्या अनेक चवींच्या नात्यांची...
गुढी आपल्या माणूस नावाच्या नात्यांची...
वेळ काळ बघून नव्हे तर, प्रत्येक क्षण साथ देणाऱ्या माणुसकीची...

रोज असावी 'चैत्रासारखी' नवी पहाट...
रोज दरात नसली तरी 'मनात' असावी
माणुसकीच्या गुढीची साथ...
स्वार्थ असला नात्यामध्ये की
'आपलेपणाला' करतो सपाट...
वेळ कधी, कशी, कोठून, कोणावर येईल सांगता येत नाही. पण जेव्हा येईल तेव्हा उभे राहू एकमेकांसाठी पूरक असणारी 'आपुली माणूस' जात...

***नूतन मराठी वर्षाच्या सगळ्या "WRITCO" वरील मित्र मैत्रिणींना माझ्याकडून गुढी पाडव्याच्या खुप साऱ्या शुभेच्छा*** 💐💐💐💐🙏🙏🍥🍥🍥

{POURNIMA}🖊️