...

18 views

रणरागिनी

अबला तू, सबला तू
भारत मातेची रणरागिनी तू
आत्मसन्मानाची ज्योत तू
पेटत्या दिव्याची आस तू
झाशीच्या राणीची शक्ती तू
जिजामातेचं स्वरूप तू
लढणारी शूर मर्दानी तू
दाखवून दे सामर्थ्य तू
मिराबाईची भक्ती तू
वात्सल्याची सिंधुताई तू
घराघरातली मुक्ताबाई तू
ओठांवरची जना तू
सावित्रीची लेक तू
बहिणाबाईंच्या मनात तू
आनंदीची ममता तू
मधुबाला तू आणि माधुरी ही तू
अनोख्या सौन्दर्याची मस्तानी ही तू
लतादीदींच्या सुरात तू
सुधा मूर्तीची कल्पना तू
मेरी कौम ची स्फूर्ती तू
घरा घरातील साक्षरता तू
माझी माय तू