...

2 views

पावसाची आतुरता
जळालेल्या पिकाकडं बघत
शेताच्या मधी होती ऊभी
आकांतन रडत कशी
जाब विचारत होती नभी.......

सांग पावसा तुझ्या वीणा
शेत कसं पिकलं का कधी
हात जोडून विनवते
आमचा विचार कर आधी.....

तूझ्या अश्या न येण्याने
पार शेत गेलं करपून
अन् माझ्या धन्याचं
भान गेलं हरपून

कधी बरसतोस इतका
पिकाची होते नासाडी
कधी वाट पाहाया लावतोस
जीवाची करून आकांडी......

माझा धनी करील आत्महत्या
मग सावकार येईल दारी
लेकरांची लागल वाट
दाणादाण होइल घरी.......

लेकरांची माझ्या बघून घुसमट
काळजात होइल धडधड जणू
आता जीव मला झालाय जड
कधी भी सरणावर जाईल तनू...
                              पावसाची आतुरता
                         मनिषा मिसाळ (लोखंडे)