...

4 views

काळ
मी लिहून ठेवलय कागदावर
माझ्या मनातील भावना
एकदा जाऊन वाच
मी सहन केलेल्या वेदना

अमाप प्रेम केले तुझ्यावर
तेही तुझ्या नकळत
अचानक उमगले गोंडस प्रेम
पाहून तुझी हसरत

तुला सांगण्याचे धैर्य मी
कधीच नाही केले
तुला गमवण्याच्या भीतीत
मला भविष्य माझे दिसले

तू सोबत रहाविस म्हणून
मी व्यसन मोह मोडले
तुझ्या सुखासाठी
माझ्या प्रिय मित्रांना सोडले

तुझ्या प्रत्येक छोट्या दुःखात
डोळे माझे रडलेत
तुझ्या प्रत्येक मोठ्या सुखात
शब्द माझे हसलेत




© All Rights Reserved