आपली मराठी
माझी माय मराठी ,
माझी आय मराठी,
रोज बोलतो ती भाषा मराठी.
संस्कृत सारखी अभिजात असणारी,
तुकाच्या अभंगात येणारी,
जिजाऊच्या लेकाला बोलनं शिकवणारी ,
महाराजांच्या किल्ल्यांना अर्थ देणारी ,
स्वराज्याला एकत्र जपणारी ,
ती भाषा मराठी.
सह्याद्रीच्या रक्तात असणारी,
स्वराज्याच्या छाव्याची गोष्ट सांगणारी ,
भगव्याला शब्द देणारी ,
मावळ्यांच्या बोलीत असणारी ,
ती आपली मराठी
महाराष्ट्राची शान दाखवणारी,
कुसुमाग्रजांच्या लेखनात असणारी ,
टिळकांच्या केसरीत झळणारी,
जीवाल जीव लावणारी,
आपली माय-बाप असणारी,
ती भाषा मराठी,
ती आपली मराठी...
© All Rights Reserved