...

5 views

शेतकऱ्याच्या शेताचा खरा मानकरी
पहाटे पहाटे लवकर उठे
मालकाच्या आधी
काय सांगू गड्या
माझी बैल जोडी साधी

शेतामध्ये जाण्यासाठी
घेता हाती काठी
मी पुढे जाता
माझ्या येती नेहमी पाठी - पाठी

शेतात नांगरताना ओठावरी जेव्हा
जुनी गाणी येती
घुंगराच्या तालावरी
साथ मला देती

सोन केल त्यांनी जिथ
आधी होती माती
डोळ्यामध्ये येत पाणी
बघूनीया फुललेली शेती

हीच असते त्या
मुक्या जनावराची रीत
तूला मला कधीच मानवा येणार नाही
एवढी करतात नेहमी प्रीत

शेतीची कामे मुका असुनी
ते गप्पगुमाने करी,
म्हणूच ह्या मुक्या बैल जोडीला
बोले आहे शेताचा खरामानकरी.....
© @Swa_hitkalambate 1044.