...

8 views

वेदना...
गोड गोड बोलुन कुर्तडलेल्या माझ्या हृदययाची शिलाई अजुन बाकी ये...
शरिरभर पसरलेल्या विश्वासाच्या जाळखंडांची सफाई अजुन बाकी ये..
अंतर अंगाला झालेल्या जखमांवर दवाई अजुन बाकी ये..
पुण्यत्वाने लाभलेल्या ह्या देहात साचलेल्या सुविचारांची द्रुगंधी अजुन बाकी ये...
जन्माला तर आलोय मी, पण ह्या जगात जगा प्रमाने जगनं, तेवढं अजुन बाकी ये...

डोळ्यांतुन निघालेल्या प्रत्येक आसवांचा हिशोब अजुन बाकी ये..
या शरिराला लागलेल्या मानुसकिच्या किडेची फवारणी अजुन बाकी ये..
साधेपणाचा ह्या शरिरावर चढलेला गंज उतरवणे अजुन बाकी ये..
मन तर कधीच मरुन पडलय, त्याला दहन करण, तेवढं अजुन बाकी ये..
जन्माला तर आलोय मी, पण ह्या जगात जगा प्रमाने जगनं, तेवढं अजुन बाकी ये...

गुलाबाच फुल बनुन, बाभळीच्या काट्यावानी टोचनाऱ्यांचा आभार अजुन बाकी ये..
डोक्यावर मायेचा हात ठेऊन, गळा दाबनाऱ्यांचा सन्मान अजुन बाकी ये..
आयुष्याची वाट दाखवता दाखवता, वाट लावणाऱ्यांचा सत्कार अजुन बाकी ये...
जन्माला तर आलोय मी, पण ह्या जगात जगा प्रमाने जगनं, तेवढं अजुन बाकी ये...

सावली सारखं सोबत राहुन, सावलीवर जळनाऱ्यांचा उध्दार अजुन बाकी ये..
पावलांवर पाऊल ठेवुन चालता चालता, पाय मोडणाऱ्यांचा पुरस्कार अजुन बाकी ये..
आता पर्यत भोगलेल्या वेदनांचा, आज शेवट तेवढा अजुन बाकी ये..
जन्माला तर आलोय मी, पण ह्या जगात जगा प्रमाने जगनं, तेवढं अजुन बाकी ये...
-अजित पवार (Aj)
© All Rights Reserved