...

18 views

कविता...
आयुष्यात जगणं ते रोजचंच
​रोजचीच ती जगण्यासाठीची कसरत
​प्रश्नही असंख्य
​या धकाधकीत....
​परिस्थिती ही नाजूक च
​अचानक त्या प्रश्नावलीतील
​एखादा प्रश्न आ वासून
​समोरच उभा ठाकतो...
​पण तो प्रश्न सुद्धा
​असतो गाफील...
​नकळत त्या प्रश्नाआधीच
​नेमका तो परिस्थितीला दिसतो...
​आणि.. बघताक्षणीच
​परिस्थितीचे त्या प्रश्नाशी
​अतूट असे बंध जुळते
​मनातही मग विचारांची
ती माला ​असते सुरू...
​कुठून कसे आले हे
​आयुष्यात कुठल्याही
​वळणाशिवाय
​इतके सारे परिस्थितीरूपी
​अणकुचीदार रूतणारे काटे...

​ शोभा मानवटकर...


© All Rights Reserved