...

12 views

खुप काही सांगायच होत
खुप काही सांगायच होत.

मनातल्या कोपऱ्यातला भाव मांडायचा होता.
खुप काही सांगायच होत.

भुतकाळातील आठवनींच धुसर झालेल चित्र स्षट करायच होत.
खुप काही सांगायच होत

रोजच्या नजरानजरेतुन बोलायच होत
खुप काही सांगायच होत.

मनातला अबोल,रुसवा,फुगवा ओठांवर आणायचं होत.
खुप काही सांगायच होत.

कोडुन घेतलेल्या अश्रुंचे बांध फोडायचे होते
खुप काही सांगायच होत.

हृदयाच्या जखमेला मलम लावायचा होता.
खुप काही सांगायच होत.

तुझे जुने फेोटो पाहत रेंगाळायच होत.
खुप काही सांगायच होत.

तुझ्याबद्दल समाजाला ओरडुन सांगायच.
खुप काही सांगायच होत.
खुप काही सांगायच होत.
© आठवनीचा कोंडमारा