...

1 views

बाप
बापाच्या काय मांडू कथा,
एकटा सोसतो सगळया व्यथा....

कुणा होवू देत नाही जाणीव,
स्वतः सोसतो सगळया उणीव...

असेल कठोर वरून जरी
लेकरासाठी पडतो तुटून परी....

स्वतः घालतो फाटकं- तूटकं,
लेकरा देतो नीटनेटकं....

कुटुंबासाठी गळतो घाम,
त्याचं कुणा नसते दाम....

आपला बाप असतो जोवर,
वाकडी नजर कुणाची नसते तोवर...

बापाची जरी कठोर वाणी,
डोळ्यात येवू देत नाही पाणी.....
                     बाप
                  मनिषा मिसाळ ( लोखंडे)