...

4 views

एक सकाळ होईल | Post Covid Pandemic
एक सकाळ होईल ,
जेव्हा लोकांच्या खांद्यांवर ऑफिस बॅग असेल ऑक्सिजन सिलिंडर नाही ,
रस्त्यावर रुग्णवाहिका नसुन शाळेच्या व्हॅन असतील ,
आणि गर्दी औषधी दुकानात नसून चहाच्या टपरीवर असेल.
एक सकाळ होईल ,
जेव्हा पापाला चहा बरोबर पेपर मिळेल,
तेव्हा आजोबा बाहेर निघून निर्भयपणे पार्क मध्ये चक्कर मारतील ,
आणि आजी टेरेसवरून दर्शन न घेता पायाने मंदिरात येईल.
एक सकाळ होईल ,
जेव्हा कॅरम आणि लुडोच्या खेळण्यारयाच्या हातात बॅट आणि बॉल असेल ,
तेव्हा शेतात शांतता येणार नाही, मोठ्याने आवाज होतील,
आणि शहरांचे सर्व निर्बंध दूर होतील
व पुन्हा उत्सव होईल.
एक सकाळ होईल,
जेव्हा आपण आयुष्यभर प्रत्येकाला मिठीत घ्याल,
तेव्हा कडव्या आठवणी आठवून आपण पुन्हास्मित कराल आणि जगाला सांगाल , डोळे उघडा , आम्ही परत आलो , एका नव्या उमेदीने......

Use your mask and get vaccinated..... 🙏
~ ऋषिकेश कदम पाटिल ~


© RMK