कविता...
विघ्नहर्ता गणेशा
आगमन तुझे संसारी
सार्वजनिक उत्सव जरी
कौतुक तुझे घरोघरी...
वास्तव्य तुझे घरात
जणू चैतन्य मना मनात..
दारी मांगल्याची आरास
वडीलधाऱ्यांचा अमूल्य सहवास...
धार्मिक श्रद्धेतील कोंदण तू
कौटुंबिक आनंदातला बहर तू...
निरोप तुला देतांना
नकळत डोळे पाणावतात...
तू परत येण्याच्या वचनाने
मात्र आनंदाश्रुंनी सुखावतात...
विद्येचा तू बुद्धिदाता...
चौदा विद्या आणि
चौसष्ट कलांचा...
आनंद घेणारा नि देणारा
रसिक तू विघ्नहर्ता...
विघ्न...
आगमन तुझे संसारी
सार्वजनिक उत्सव जरी
कौतुक तुझे घरोघरी...
वास्तव्य तुझे घरात
जणू चैतन्य मना मनात..
दारी मांगल्याची आरास
वडीलधाऱ्यांचा अमूल्य सहवास...
धार्मिक श्रद्धेतील कोंदण तू
कौटुंबिक आनंदातला बहर तू...
निरोप तुला देतांना
नकळत डोळे पाणावतात...
तू परत येण्याच्या वचनाने
मात्र आनंदाश्रुंनी सुखावतात...
विद्येचा तू बुद्धिदाता...
चौदा विद्या आणि
चौसष्ट कलांचा...
आनंद घेणारा नि देणारा
रसिक तू विघ्नहर्ता...
विघ्न...