...

44 views

किती समजावले मी स्वतःला
@Pranil_Gamre
किती समजावले मी स्वतःला
सोडून गेली तू ह्या जगाला

तुझा स्पर्श जाणवतो पुन्हा पुन्हा का मला
अबोल आठवणीत स्मरतो ग मी तुला

तुझ्या सोबती होते जग माझे
जगा वेगळे होते नाते माझ्याशी तुझे

तुला स्मरण करताच पापण्या ओलावतात
तुझे स्वर मला तुझपाशी बोलावतात

स्वप्न आपले अपुरे राहिले
स्वप्नात माझ्या तुला पाहिले

मिटूनी डोळे झोप येत नाही
तुझा चेहेरा डोळ्या समोर येत राही

आता नाही भेटशील या जगी कुणाला
असे समजावले मी माझ्या मनाला

तुझे भास होते आता ते देखील नाही
जग माझे तुझ्याविना सुने ते सुनेच राही

© Pranil_Gamre