...

5 views

भांडण..
ये राणी तुझा रंग गोरापान, अन् गुलाबावानी गाल...
तुला पहाताच आठवते, भिंतीवर चिकटलेली पांढरी पाल...

मी पांढरी पाल, तर तुम्ही कोळशाची खाण...
रात्र होता अंधारही घाबरतो, पाहून तुमचं हे ध्यान...

अग तुझं भलं मोठं डोकं, त्यावर काळे-भुरे केस...
पहाता तुझ्याकडे, भासे जसे गोठ्यामध्ये बांधलेली म्हैस...

राजा काडीवानी बाॅडी तुझी, तुला वाऱ्याच भ्याव...
अक्कल नाय एक दमडी ची, अन् म्हणे मी तुझा राव...

अक्कलेची गोष्ट राणी तु माझ्या समोर करुच नको...
मॅगी कशी बनवाची, हे Google वर शोधनारी तु...
तु माझ्या अक्कलेचा विषय काढुच नको...

आ..हा..आला मोठा अक्कल वान, हुशार, दिमाखदार, सर्व गुण संपन्न तु...
कधी तरी अंघोळ करून बघ, डोक्यात झाल्यात किती गोचिड अन् ऊ...

अग.. नवरा मी तुझा, जरा दोन शब्द प्रेमाने वाग...
आयुष्याची जोडी आपली, नको धरू असा माझ्यावर राग...
मी पण आहे तुमची बायको, याचं असुद्या थोड भान...
आधी भांडायच अन् नंतर म्हणायचं, तु माझी जान...

अग.. भांडण तर कधी रुसवा असाच थोडा थोडा करत जाऊ राणी...
संसाराला भांडणाशिवाय अर्थ नाही, सांगुन गेलीये संतांची वाणी...
कधी गोड तर कधी आंबट अशीच चालु दे, आपल्या संसाराची गाडी...
दोघेही मिळुन उभी करु, आपल्या संसाराची माडीवर माडी...
-अजित पवार (Aj)

© All Rights Reserved