...

7 views

ती भेट
आज हा रस्ता कायमचा ओळखीचा होणार होता...!
तीच्या सोबतीचा हा प्रवास नव्या आठवणींना जन्म देणार होता...!
माझ्या खांद्यावर आयुष्यभर कोणाचा हात राहिल याचा आज निकाल होणार होता...!
देवा समोर ठेवलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर, देव आज देणार होता...!
ती भेटताचं...!
तीच्या सोबतीचा सहवास, मनाला मनसोक्त नाचवत होता...!
आमच्या दोघांन शिवाय जगात आज कोणीही नाही, मन मनालाच भासवत होता...!
तीच्या ओठांतुन निघणार प्रत्येक शब्द न शब्द हृदयात घर करत होता...!
तीच्या होकाराची वाट मन आतुरतेने पहात होता...!
तेवढ्यात ढगांचा कडकडाट झाला...!
पाऊस आमच्या कडे धावत-पळत आला...!
अन् २ मिनिटांच्या भेटीत अंग भिजवून गेला सारा...!
पाऊसाचे थेंब तीच्या गालावरुन सैरावैरा लागले होते पळु...!
त्यांना पाहून मात्र, माझ मन लागलं होत जळु...!
गाला भोवती लुडबुडनाऱ्या बटीनां ती दुर लागली होती सारू...!
तीच्या मदतीसाठी माझाही हात, तीच्या गालाची वाट लागला होता चालू...!
क्षणात थांबलो..!, हाताला सावरलं..!
हाताच्या बेशिस्ती वर हृदय मात्र रागवलं...!
घराच्या वाटेला पाऊल त्याने टाकलं..
तेवढ्यात...!
तीच्या ऐका हाकेने पाऊले तीथेच झाली स्तब्ध...!
जवळ येऊन माझ्या, उद्गरले तीने प्रेमाचे ते शब्द...!
ऐकताच ते शब्द झालो मी नीशब्ध...!
तीच्या गालावर उमटलं छोटंस हसु, अन् झाले सारे जग स्तब्ध...!
तेव्हा पासून झालोय मी तीच्या प्रेमात कायमचा व्यस्त...!
- अजित पवार (Aj)
© All Rights Reserved