...

6 views

शिवजन्मापूर्वी संतांची कामगिरी
महारष्ट्रात काही होऊन गेले संत थोर
त्यांनी लोकांना दिले चांगले गुण फार
संत असे चक्रधर,नामदेव,ज्ञानेश्वर,एकनाथ
समतेची भावना त्यांनी लोकांना दिली एकसाथ

गुजरातमधील राजपुत्र हे असे स्वामी श्री चक्रधर
वैराग्यवृत्ती धारण करुनी आले महारष्ट्राच्या भूमीवर
कधीच स्त्री पुरुष, जातीपाती हे मान्य नव्हते त्यांना
'महानुभाव पंथ' असे म्हणत स्थापन केलेल्या पंथांना

थोर संत नामदेव ह्यांचे महाराष्ट्रातले नरसी हे गाव
सतत मनापासून करीत असे विठ्ठलाची रे भक्तिभाव
जीवनात त्यांनी रचले अनेक अभंग व कीतर्न सारी
धर्मरक्षण व भक्तिमार्ग आणले लोकांच्या मनी खरी

आपेगाव - पैठण ह्या ठिकाणी जन्माला हे आलेरे
त्या काळात धर्माचेज्ञान संस्कृत भाषेत बंदिस्त झालेरे
सर्वसामान्य लोकांसाठी मराठीतून ज्ञानेश्ववरी लिहिलीरे
संत ज्ञानेश्वरांनी जिवंतपणे आळंदी येते समाधी घेतलीरे

भक्त्तीमार्गाचा प्रसार संत एकनाथांनी पुढे जगी चालवले
अनेक अभंग, ओव्या व भारुडे सारी जीवनात लिहून ठेवले
उपदेश केला असा उच्चनीय भेदभाव मानू नका कोणताही
मनात उमटवली लोकांच्या समतेची व ममतेची भावना अशी ही

कवी✍️ :- स्वहित दिपक कळंबटे
( स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य )

© @Swahit kalambate 1044.